व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Uddhav Balasaheb Thackeray : पहिले नाव नव्हते, नंतर थेट एबी फॉर्म, माजी...

Uddhav Balasaheb Thackeray : पहिले नाव नव्हते, नंतर थेट एबी फॉर्म, माजी महापौरांना दिलासा!

Shivsena nominates former Mayor Kishori Pednekar : अखेर ठाकरे गटाकडून किशोरी पेडणेकरांना एबी फॉर्म

Mumbai : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना उमेदवारी मिळणार की नाही याबाबत काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. सुरुवातीला जाहीर झालेल्या उमेदवारांच्या यादीत किशोरी पेडणेकर यांचे नाव नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते. मात्र आता एबी फॉर्म मिळाल्याने त्यांच्या चेहर्‍यावर हसू फुलले आहे.

किशोरी पेडणेकर या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मधील महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक आहेत. त्या पूर्वी मुंबईच्या महापौर राहिल्या असून पक्षाच्या महिला नेत्यांमध्ये त्यांचा प्रभाव आहे. म्हणूनच यादीमध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख नसल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.

Ajit Pawar : अजितदादांनी गँगस्टरच्या बायकोला दिली उमेदवारी

अर्ज भरण्याची शेवटची तारीख जवळ येत असताना त्यांनी मातोश्रीवर धाव घेतली होती. अखेरीस २९ डिसेंबर २०२५ रोजी त्यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आणि त्यांनी एबी फॉर्म दाखवत पहिली प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, “निवडणुकीची एक प्रक्रिया असते. आपण जागा नेमकी कुठे आणि कशी सोडतोय? या गोष्टी पक्षप्रमुखांनुसारच होतात. बऱ्यापैकी एबी फॉर्म हे मिळालेले आहेत. हाच फॉर्म मला देखील मिळालेला आहे. शाखा प्रमुखाच्या पत्नीला देखील देण्यात आला आहे. फक्त एक वॉर्ड आम्हाला सोडण्यात आलेला नाही, ते लवकर कळेल.”

Akola Municipal Corporation Election : भाजपचा अकोल्यात गुजरात पॅटर्न, साठ टक्के नवीन चेहरे मैदानात

आता पेडणेकरांना उमेदवारी मिळाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मुंबई महापालिका ही देशातील सर्वात मोठी आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची महापालिका मानली जाते. त्यामुळे प्रत्येक पक्ष या निवडणुकीत आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. किशोरी पेडणेकर यांना उमेदवारी मिळाल्याने उद्धव ठाकरे गटाने महिला नेतृत्वाला प्राधान्य दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

error: Content is protected !!