BMC Elections : एकनाथ शिंदे आणि संजय राऊत एकत्र येणार?

Eknath Shinde and Sanjay Raut hold talks : दोघांच्या भेटीने मुंबईच्या राजकारणात तर्क-वितर्क

Mumbai महाराष्ट्राचं राजकारण सध्या असं झालंय की कोण कोणाच्या गटात आहे, कोणी कोणाच्या पक्षात प्रवेश केलाय हे काही कळायला मार्ग नाही. सकाळी एका पक्षात असलेला नेता रात्री दुसर्‍याच पक्षात शिरतोय. त्यामुळे राजकारण एका वेगळ्यच वळणावर आहे. आता मुंबईत घडलेल्या एका अनपेक्षित भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट झाल्याने सर्वांचे डोळे विस्फारले आहे.

एकनाथ शिंदे आणि संजय राऊत हे दोन्ही नेते परस्परविरोधी गटांचे प्रतिनिधित्व करतात. संजय राऊत हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रमुख नेते मानले जातात. त्यांनी गेल्या काही वर्षांत शिंदे गटावर तीव्र टीका केली आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदे यांनीही उद्धव गटावर अनेकदा हल्लाबोल केला आहे. अशा परिस्थितीत दोन्ही नेत्यांची भेट होणे ही अनपेक्षित घटना मानली जात आहे. या भेटीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Municipal election : काँग्रेसला मोठा धक्का; निलंबनानंतर ‘ते’ १२ नगरसेवक थेट भाजपात

ही भेट पूर्वनियोजित नसून पूर्णपणे अचानक झाली होती, अशी माहिती समोर आली आहे. मुंबईत एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ही भेट झाली. दोन्ही नेते काही वेळ एकत्र आले आणि संवाद साधला. या भेटीनंतर लगेचच सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. अनेकांनी प्रश्न उपस्थित केला की, शिंदे आणि राऊत यांची भेट ही भविष्यातील राजकीय समीकरणांची खूण आहे का?

ही भेट केवळ औपचारिक होती. मात्र महाराष्ट्रातील राजकारण सध्या अस्थिर आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्रात काय होईल याचा काही नेम नाही.