Raver Municipal Council Election : अरे देवा! आता भाजप-काँग्रेसची युती? जळगावात नवा राजकीय प्रयोग

peculation over BJP–Congress tie-up : रावेरमध्ये सत्तेसाठी काँग्रेस ‘किंगमेकर’; भाजपला पाठिंबा देण्याच्या हालचालींनी राजकीय गोटात खळबळ

Jalgao महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘काहीही होऊ शकते’ असा काळ सुरू असतानाच, जळगाव जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. रावेर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत चक्क भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि काँग्रेस एकत्र येण्याची चिन्हे दिसत आहेत. जळगावमधील या संभाव्य युतीमुळे केवळ स्थानिक पातळीवरच नाही, तर संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या गेल्या आहेत. सत्तेचे गणित जुळवण्यासाठी हे दोन कट्टर पारंपरिक विरोधक आता एकमेकांचा हात धरणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रावेर नगरपरिषदेत सत्तेचा पेच अत्यंत रंजक वळणावर पोहोचला आहे. नगरपरिषदेत कोणत्याही एका पक्षाकडे स्पष्ट बहुमत नसल्याने ‘काँग्रेस’ आता निर्णायक भूमिकेत आली आहे. सध्याची आकडेवारी पाहता:
भाजप: ९ नगरसेवक + २ अपक्ष = ११ जागा
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट): १० नगरसेवक
काँग्रेस: २ नगरसेवक
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट): १ नगरसेवक
बहुमतासाठी १२ जागांची आवश्यकता असून, भाजपने ११ चा आकडा गाठला आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसचे २ नगरसेवक जर भाजपला पाठिंबा देतात, तर भाजपची सत्ता सहजपणे येईल. काँग्रेसने भाजपला साथ दिल्यास राजेंद्र चौधरी यांची उपनगराध्यक्ष पदावर वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.

Shashikant Khedkar : भाजपा-काँग्रेस एमआयएमसोबत जाऊ शकतात, तर आम्ही शिवसेनेसह का नाही?

अशीच धक्कादायक युती यापूर्वी अंबरनाथ नगरपरिषदेत पाहायला मिळाली होती. तिथेही काँग्रेस आणि भाजपने हातमिळवणी करत सत्ता मिळवली होती, ज्यानंतर काँग्रेसने आपल्या १२ नगरसेवकांचे निलंबन केले होते. आता जळगावमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने भाजपशी हातमिळवणी करण्याचे संकेत दिले आहेत. हा ‘अंबरनाथ पॅटर्न’ जळगावात यशस्वी झाल्यास राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांमधील अंतर्गत विसंवाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर येईल.

Ladaki Bahin Yojana : कुटुंबात शासकीय नोकरदार नसतानाही ‘लाडकी बहीण’चे अर्ज नामंजूर; ई-केवायसीतील चुकांमुळे लाभार्थींवर अन्याय

२०२६ च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यांत घेतल्या जात असताना, जळगावमधील हा ‘चमत्कार’ भविष्यातील नव्या राजकीय समीकरणांची नांदी ठरू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसनेही सत्तेसाठी मोठी फिल्डिंग लावली असली, तरी काँग्रेसची भूमिका येथे ‘किंगमेकर’ ठरत आहे. जर काँग्रेसने भाजपला साथ दिली, तर राज्यात पुन्हा एकदा “राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो,” हे सिद्ध होईल. आज होणाऱ्या निवडीनंतर जळगावच्या राजकारणाची दिशा स्पष्ट होणार आहे.\