Mehkar Municipal Council : नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांचीच निवड, सत्तासमीकरण बदलले

Defeated candidates find place as members : काँग्रेसचे अलीम ताहेर उपाध्यक्ष, शिंदे सेना-काँग्रेस अघोषित युतीचा वरचष्मा

Mehkar मेहकर नगरपालिकेतील सत्तासंघर्षात काँग्रेसने निर्णायक बाजी मारली आहे. सर्वसाधारण सभेत काँग्रेसचे गटनेते मोहंमद अलीम ताहेर यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. नगराध्यक्ष किशोर गारोळे (शिवसेना उबाठा) यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. याच सभेत स्वीकृत नगरसेवकपदी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष कासमभाई गवळी, शिवसेना शिंदे गटाचे अजय अरविंद उमाळकर, तसेच शिवसेना उबाठा गटाचे अमर घोडे यांची निवड करण्यात आली.

नगरपालिकेतील सध्याचे संख्याबळ पाहता, उबाठा गटाचे ६ नगरसेवक, काँग्रेसचे ११, तर शिवसेना शिंदे गटाचे ९ नगरसेवक आहेत. उबाठा गटाला सहकार्य न करण्याची ठाम भूमिका काँग्रेसने घेतल्याने, स्थानिक आमदार सिद्धार्थ खरात आणि नगराध्यक्ष किशोर गारोळे यांची राजकीय कोंडी झाली असल्याचे चित्र आहे.

Deulgao Raja Municipal Council : देऊळगाव राजा नगर परिषदेत महायुतीची सत्ता भक्कम; उपाध्यक्षपदी वनिता भुतडा विजयी

उपाध्यक्ष पदासाठी उबाठा गटाने उमेदवारी दाखल केली होती. मात्र, सभागृहात बहुमत नसल्याने अखेर उबाठा उमेदवाराने अर्ज मागे घेतला. परिणामी, काँग्रेसचे अलीम ताहेर यांचा बिनविरोध मार्ग मोकळा झाला. एकूण २६ नगरसेवक असल्याने नियमानुसार तीन स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात आली.

विशेष बाब म्हणजे, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत झालेले काँग्रेसचे कासमभाई गवळी आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अजय उमाळकर यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून पुन्हा सभागृहात स्थान मिळाले. सध्याची स्थिती पाहता, उबाठा ६ विरुद्ध काँग्रेस-शिंदे गट २० असे स्पष्ट सत्तासमीकरण झाले आहे. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या ६ विषय समित्यांचे सभापती पद तसेच स्थायी समितीच्या निवडीत काँग्रेस व शिवसेना शिंदे गटाच्या अघोषित युतीचे वर्चस्व राहणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.

Sudhir Mungantiwar : चंद्रपूरच्या अलीची गुजरात येथे अखिल भारतीय सागरी जलतरणात झेप

काँग्रेसचे नगरसेवक, नेते कासमभाई गवळी व समर्थकांनी जानेफळ मार्गावरील कार्यालयापासून नगरपालिकेपर्यंत सायकल रॅली काढत आपली ताकद दाखवली. तर शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक शिवसेना कार्यालयापासून ऑटोरिक्षाने नगरपालिकेत दाखल झाले. अलीम ताहेर यांच्या उपाध्यक्षपदी निवडीची घोषणा होताच काँग्रेस समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व जल्लोष करत आनंद व्यक्त केला.