Breaking

Chandrashekhar Bawankule : नागपुरातील अतिक्रमणे तातडीने काढा !

Immediately remove the encroachments in Nagpur : महसूलमंत्र्यांनी महानगरपालिकेत घेतला आढावा

Nagpur नागपुरात रस्त्यांवर वाढलेले अतिक्रमण सातत्याने चर्चेचा विषय राहिला आहे. दोन दिवसांपूर्वी वाहतूक पोलिसांनी फुटपाथ फ्रीडम अभियान राबविले होते. त्याला किती प्रतिसाद मिळतो याची खात्री नाही. पोलिसांच्याच आशीर्वादाने नागपुरात अतिक्रमण वाढले असल्याचेही बोलले जाते. पण आता खुद्द महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीच हे अतिक्रमण मनावर घेतले आहे.

उपराजधानीतील वाढत्या अतिक्रमणावर त्यांनी चिंता व्यक्त केली. तसेच अतिक्रमण तातडीने काढण्याचे निर्देश बावनकुळे यांनी दिले आहेत. त्यांनी शहरातील विविध समस्यांचा नागपूर महानगरपालिकेत आढावा घेतला. नागपूर शहराचा मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. मात्र, असे होत असताना मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत आहे. शहर विद्रूप केले जात आहे. याची दखल घेत तत्काळ संपूर्ण शहराचे सर्वेक्षण करा. रस्त्याच्या काठावर बसणारे मटण विक्रेते, इतर व्यावसायिकांवर कारवाई करा, असे निर्देश मंत्र्यांनी दिले.

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांना स्पीड पोस्टने आली कायदेशीर नोटीस

अवैधपणे बांधण्यात आलेली सर्व अतिक्रमणे तोडण्याचे स्पष्ट निर्देश महसूल मंत्र्यांनी दिले आहेत. यासाठी पोलिस प्रशासनाची मदत घ्या, असेही ते म्हणाले आहेत. यावेळी आमदार कृष्णा खोपडे, आमदार चरणसिंग ठाकूर, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर, मुख्य अभियंता लीना उपाध्ये, आदी उपस्थित होते.

नागपूर शहरात पुरेसा पाणी पुरवठा होत आहे. पण गळतीमुळे अनेक भागांमध्ये मुबलक पाणी मिळत नाही. त्यामुळे गळती थांबवा व पाणी चोरी करणाऱ्यांवर कारवाई करा, अशी सूचना बावनकुळे यांनी केली. तसेच शहरातील बंद असलेल्या कॅमेऱ्यांच्या माहितीचा अहवाल कारणासह सादर करावा, असेही ते म्हणाले आहेत.

Gondia Police : सीट बेल्ट लावला नाही, ५५ लाख २३ हजार रुपयांचा दंड !

नाल्यांच्या सुरक्षा भिंतीसंदर्भात स्वतंत्र डीपीआर तयार करा, असे आदेशदेखील त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. नागपुरात अतिक्रमण ही मोठी समस्या झाली आहे. नागपूर पोलिसांनीदेखील फूटपाथवरील अतिक्रमणे काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मात्र मागील काही वर्षांतील अनुभव लक्षात घेता काही दिवस मोहीम चालते व त्यानंतर सर्व जैसे थे होऊन जाते. अशा स्थितीत आता बावनकुळे यांच्या निर्देशांचे कितपत पालन होणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.