Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंचा दावा, आम्ही महायुती म्हणूनच लढणार !

Mahayuti will fight together in local body elections : अजित पवारांना मत मांडण्याचा अधिकार

Nagpur स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणूका स्वबळावर न लढता मित्रपक्षांसोबत लढण्याचे संकेतच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) स्वबळाचा नारा दिला आहे. पण आम्ही महायुती म्हणूनच समोर जाणार आहोत, असं बावनकुळेंनी स्पष्ट केलं आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या चार महिन्यांमध्ये होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांसाठी सारेच पक्ष सज्ज झाले आहेत. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्यांना मुदतवाढीचा प्रश्न संपला आहे. तेथे प्रशासकांचा कारभार आहे. त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्यासाठी सकारात्मक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न महायुती करत आहे.

Chandrashekhar Bawankule : नागपुरातील अतिक्रमणे तातडीने काढा !

स्थानिक युनिट म्हणूनच आम्ही विचार करू. अजित पवार यांनी काय बोलावे हा त्यांचा अधिकार आहे. जेथे शक्य असेल तेथे आम्ही महायुती म्हणून समोर जाऊ, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. ते शनिवारी नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.

आम्ही विधानसभा निवडणूकीत एकीने लढलो. त्याचा निकाल सर्वांसमोर आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतदेखील एकत्रच निवडणूक लढण्याची आमची भूमिका आहे. त्यादृष्टीने तीन्ही प्रमुख पक्षांचे नेते योग्य तो निर्णय घेतील, असे बावनकुळे यांनी सूतोवाच केले. यावेळी त्यांनी प्रॉपर्टी कार्डबाबतदेखील मोठे भाष्य केले.

Ambazari Road Construction : अर्धा मार्ग बंद होणार, पूर्ण मार्ग खुला होणार !

पंधरा हजार गावांमध्ये स्वामित्व योजनेचे कार्ड वाटप झाले आहे. स्वामित्व योजनेतून गावठाण, वाड्यापाड्या, धनगरवाड्यांना, आदिवासीना घरांचं स्वामित्व मिळाले आहे. ज्यांच्याकडे प्रॉपर्टी कार्ड नाही त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळाले आहे. स्वामित्व कार्ड आणून विकसित महाराष्ट्र मजबूत करण्यासाठी मोठा पाऊल उचलण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

मेळघाटमध्ये जादूटोणाच्या संशयावरून आदिवासी महिलेचा छळ करण्यात आला. मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी भेटून त्यावर चर्चा करणार आहे. सरकारने कारवाई केली आहे. पुन्हा अशा घटना होऊ नये यासाठी काम करणार आहोत. विरोधकांना टीका करण्याचेच काम आहे. अडीच वर्षे त्यांनी महाराष्ट्र मजबूत केला नाही. मुख्यमंत्री दाओसला जात आहेत व त्यांच्यामुळे महाराष्ट्र हे देशातील सर्वात गुंतवणूक आणणारे राज्य ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.