Malkapur Congress : स्वीकृत नगरसेवक निवडीत अन्याय, निष्ठावानांची निर्धार सभा

Row over nominated corporator selection; party loyalists hold a meet : मलकापूर काँग्रेसमध्ये अस्वस्थता, कारवाई होईपर्यंत पक्षकार्य थांबवण्याचा इशारा

Malkapur नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक निवडणुकीत झालेल्या कथित अन्यायाच्या विरोधात काँग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी मलकापूर येथे निर्धार सभेचे आयोजन केले. या सभेत अन्यायाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत, दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत पक्षाचे कार्य न करण्याचा एकमुखी ठराव मंजूर करण्यात आला.

यावेळी बोलताना कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले की, जोपर्यंत संबंधित प्रकरणात ठोस कारवाई होत नाही, तोपर्यंत पक्षकार्यापासून अलिप्त राहण्याचा निर्णय कायम राहील. तसेच प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी तातडीने दखल न घेतल्यास, दिल्ली येथील इंदिरा भवनमधील अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला.

Buldhana ZP Election 2026 : बुलढाणा जिल्हा परिषदेवर भाजपचा ‘स्वबळाचा’ डोळा; मविआमध्ये पुन्हा ऐक्याचे वारे!

शहरातील तसेच मलकापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये, यासाठी सर्वांना विश्वासात घेऊन उमेदवारी देण्याची मागणी यावेळी एकमुखाने करण्यात आली. या प्रकरणावर पक्षश्रेष्ठी कोणती कारवाई करतात, याकडे निष्ठावान कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. सभेस मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Land Rates Surge: वैनगंगा–पैनगंगा नदीजोड प्रकल्पाचे वारे; हवाई सर्वेक्षणानंतर शेतीचे भाव गगनाला, पण खरेदी-विक्री ठप्प!

या बैठकीस राजेंद्र वानखेडे, मनोज सोने, सिद्धांत इंगळे, ईश्वर भदाले यांच्यासह स्वीकृत नगरसेवक पदासाठी पात्रता यादीत असलेले विनय काळे, फिरोज खान, अफसर खान, अनिल मुंधोकार आदी उपस्थित होते. उपस्थितांनी नगराध्यक्ष अतिकुर रहेमान जवारीवाले यांचा तीव्र निषेध नोंदवला.