Malkapur Municipal Council : मलकापूर नगर परिषदेत सत्ताधाऱ्यांचा दबदबा कायम

Unopposed election of chairpersons of the Standing Committee : स्थायी व विषय समित्यांच्या सभापतींची अविरोध निवड; काँग्रेसकडे ४ समित्या

Malkapur मलकापूर नगर परिषदेच्या स्थायी समिती व विविध विषय समित्यांच्या सभापती पदाची निवड प्रक्रिया सोमवार, १९ जानेवारी रोजी शांततापूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या निवडणुकीत सत्ताधारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (भाराकाँ) पक्षाने आपले वर्चस्व कायम ठेवत ४ समित्यांवर सभापतीपद पटकावले, तर विरोधी गटांना प्रत्येकी एक समिती मिळाली. विशेष म्हणजे सर्व सभापतींची निवड अविरोध करण्यात आली.

जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या आदेशान्वये नगर परिषदेत स्थायी व विषय समित्यांचे गठन करण्यासाठी निवडणूक कार्यक्रम राबविण्यात आला होता. या प्रक्रियेचे आयोजन उपविभागीय अधिकारी तथा पीठासीन अधिकारी संतोष शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात निवड प्रक्रियेला प्रारंभ झाला. यावेळी मुख्याधिकारी संजय केदार हे सहाय्यक पीठासीन अधिकारी म्हणून उपस्थित होते.

Ulhasnagar Municipal Election: उल्हासनगर महापालिकेत ‘वंचित’चा मोठा गेम; भाजपला धोबीपछाड देत शिवसेनेचा महापौर निश्चित!

निवड प्रक्रियेत नगराध्यक्ष अतिकभाई जवारीवाले हे स्थायी समितीचे पदसिद्ध सभापती ठरले. सत्ताधारी भाराकाँच्या वाट्याला आलेल्या समित्यांमध्ये

पाणीपुरवठा सभापती – शहेजाद खान,

आरोग्य सभापती – राजू पाटील,

बांधकाम सभापती – शबाना परवीन साजीद खान,

शहर व नियोजन सभापती – उपाध्यक्ष अनिल गांधी
यांची अविरोध निवड करण्यात आली.

दरम्यान, उपाध्यक्ष अनिल गांधी यांना पाणीपुरवठा सभापती पद देण्याबाबत सुरुवातीला चर्चा होती. मात्र, पाणीपुरवठा सभापतीपद पदसिद्ध स्वरूपाचे असल्याने एकाच व्यक्तीकडे दीर्घकाळ पद राहू नये व सर्व नगरसेवकांना संधी मिळावी, अशी मागणी भाराकाँच्या नगरसेवकांनी केल्याने अखेर उपाध्यक्षांना शहर व नियोजन सभापती पद देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली.

Eknath Shinde on Balasaheb Thackeray Centenary : बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीचे निमित्त शिंदेंची ‘इमोशनल’ खेळी

विरोधी गटातर्फे भाजपा प्रणित शहर विकास आघाडी, मलकापूर गटाचे अशांतभाई वानखेडे यांची शिक्षण सभापतीपदी, तर मलकापूर विकास आघाडीच्या सौ. मंगला राजू डोफे यांची महिला व बालकल्याण सभापतीपदी निवड करण्यात आली.

स्थायी समितीच्या सदस्यांमध्ये पदसिद्ध सभासद म्हणून नगराध्यक्ष व सर्व विषय समित्यांचे सभापती यांच्यासह भाराकाँचे रशिदखाँ युसुफखाँ जमादार, भाजपाचे दुर्गेश राजापुरे व एमआयएमचे शेख इमरान गुलाब यांची निवड झाल्याची घोषणा पीठासीन अधिकारी संतोष शिंदे यांनी केली.

या निवडणुकीत कोणत्याही प्रकारचा वाद न होता सर्व सभापतींची निवड अविरोध झाल्याने मलकापूर नगर परिषदेतील सत्ताधारी व विरोधकांमध्ये तात्पुरता समन्वय दिसून आला. मात्र, बहुसंख्य समित्यांवर भाराकाँचे वर्चस्व कायम राहिल्याने आगामी काळात नगर परिषदेच्या कारभारावर सत्ताधाऱ्यांचे नियंत्रण अधिक बळकट झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.