Pune Municipal Corporation : तारीख ठरली; पुण्याला “या” दिवशी मिळणार हक्काचा महापौर

Women leaders gear up strongly within the BJP for the mayor post : कोणाच्या गळ्यात पडणार माळ?, भाजपमध्ये महिला नेत्यांची जोरदार मोर्चेबांधणी

Pune पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत ११९ जागांसह ऐतिहासिक यश मिळवल्यानंतर आता सर्वांचे लक्ष ‘पुण्याचा पुढचा महापौर कोण?’ याकडे लागले आहे. गुरुवारी मंत्रालयात झालेल्या आरक्षण सोडतीत पुण्याचे महापौरपद ‘सर्वसाधारण महिला’ (Open Woman) या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने, भाजपमधील इच्छुकांच्या आकांक्षांना नवे धुमारे फुटले आहेत. विभागीय आयुक्तांच्या निर्देशानुसार, येत्या ६ फेब्रुवारी २०२६ रोजी महापौर निवडीची अधिकृत प्रक्रिया पार पडणार असून, यादिवशी पुण्याचा ‘प्रथम नागरिक’ कोण, हे स्पष्ट होईल.

पुणे महापौरपद ‘सर्वसाधारण’ असेल, असे गृहीत धरून भाजपचे अनेक दिग्गज पुरुष नेते या पदासाठी डोळा लावून बसले होते. मात्र, आरक्षण महिलांसाठी सुटल्याने गणेश बिडकर, धीरज घाटे आणि श्रीनाथ भिमाले यांसारख्या बड्या नेत्यांची संधी हुकली आहे. आता हे नेते स्थायी समिती अध्यक्षपद किंवा सभागृह नेतेपदासाठी प्रयत्नशील आहेत.

Dissatisfaction in Shivsena : ठाकरे गटात नाराजीचा स्फोट, दोन नगरसेवकांनी साथ सोडली !

भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने त्यांचाच महापौर बसणार हे निश्चित आहे. सध्या पक्षात अनेक ज्येष्ठ महिला नगरसेविकांची नावे चर्चेत आहेत:
वर्षा तापकीर: भाजप महिला आघाडीच्या उपाध्यक्ष आणि अनुभवी चेहरा म्हणून त्यांचे नाव आघाडीवर आहे.
मंजुषा नागपुरे: बिनविरोध निवडून आलेल्या आणि ज्येष्ठ नगरसेविका म्हणून त्यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.
रंजना टिळेकर: आमदार योगेश टिळेकर यांच्या मातोश्री आणि पक्षातील ज्येष्ठता यामुळे त्यांचा दावा प्रबळ मानला जातो.
स्वर्दा बापट: दिवंगत गिरीश बापट यांच्या सून असल्याने आणि बापट समर्थकांचा पाठिंबा असल्याने त्यांचे नावही स्पर्धेत आहे.
मानसी देशपांडे: पक्षातील निष्ठावान आणि आक्रमक चेहरा म्हणून त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो.

पुणे महापालिका प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे महापौर निवडीसाठी रीतसर प्रस्ताव पाठवला आहे

Shiv Sena symbol : “…म्हणून तीन वर्ष तारीख पे तारीख!” शिवसेना पक्ष–चिन्ह प्रकरणावर पुन्हा आक्षेप

१५ जानेवारी: मतदान पार पडले.
१६ जानेवारी: भाजपच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.
२२ जानेवारी: आरक्षण जाहीर झाले (सर्वसाधारण महिला).
६ फेब्रुवारी: महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक.

भाजपचे शहराध्यक्ष आणि वरिष्ठ नेते ‘सामूहिक निर्णय’ घेतील असे सांगत असले, तरी दरवेळेप्रमाणे यावेळीही पक्ष एखादा ‘सरप्राईज’ चेहरा देऊन सर्वांना चकित करण्याची शक्यता नाकारता येत नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील कोणाच्या नावावर मोहोर उमटवतात, यावरच पुण्याच्या सत्तेचा ताबा कोणाकडे जाईल, हे ठरेल.