Relentless efforts for the development of Sindkhed Raja till the las : अजितदादा अन् माँ जिजाऊंच्या जन्मभूमीचे अतूट भावनिक नाते
Sindkhedraja महाराष्ट्राचे आराध्यदैवत राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांची जन्मभूमी असलेल्या मातृतीर्थ सिंदखेडराजा आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नाते केवळ राजकीय नव्हते, तर ते अतिशय भावनिक आणि जिव्हाळ्याचे होते. जिजाऊंच्या जन्मभूमीच्या सर्वांगीण विकासासाठी अजितदादांची तळमळ सातत्याने दिसून आली. विकास आराखड्याच्या माध्यमातून त्यांनी स्वतः सिंदखेडराजा येथे बैठका घेऊन अधिकारी, लोकप्रतिनिधी व नागरिकांशी थेट संवाद साधला. त्यामुळेच दादांची नाळ खऱ्या अर्थाने सिंदखेडराजाशी जुळली होती.
अॅड. नाझेर काझी यांच्या निवासस्थानी घेतलेला जेवणाचा आस्वाद, जिजाऊ जन्मभूमीच्या विकासाबाबतची आस्था आणि दर्जेदार कामासाठी केलेली कडक भूमिका—या आठवणी दादांच्या निधनानंतर पुन्हा एकदा उजळून निघाल्या आहेत. अजितदादांच्या माध्यमातून माँ जिजाऊंच्या जन्मभूमीच्या विकासातून जागतिक स्तरावर ठसा उमटवण्याचा संकल्प प्रत्यक्षात येणार होता. मात्र दादांच्या अकाली एक्झिटने मातृतीर्थ जणू पोरके झाले आहे, अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
Death Threat to Former MP Navneet Rana : एक आठवड्यानंतर पोलीस रिकाम्या हाताने परतले
तालुक्यात अनेक ठिकाणी नागरिकांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून अजितदादांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष अॅड. नाझेर काझी यांना दुःख अनावर झाले.
अजितदादा म्हणजे रोखठोक, स्पष्टवक्ते नेतृत्व. मातृतीर्थाच्या विकासासाठी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे व अॅड. नाझेर काझी यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजितदादा सिंदखेडराजा येथे वारंवार आले. सन २०११ मध्ये त्यांनी २११ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी दिली. २०१७ मध्ये जिजाऊंचे दर्शन घेऊन जन्मभूमीच्या विकासाचा संकल्प केला. याच वर्षी पंचायत समितीत कृषी मेळाव्याचे उद्घाटन करत त्यांनी ३५० कोटी रुपयांच्या विकास आराखड्यासंदर्भात ठोस भूमिका मांडली.
Ajit Pawar death news : नगरपालिका निवडणूक प्रचाराच्या सभा ठरल्या अखेरच्या
२१ मे २०२२ रोजी जिजाऊ जन्मभूमीच्या विकासकामांसाठी त्यांनी विशेष बैठक घेतली. यावेळी तत्कालीन पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे उपस्थित होते. जिजाऊंचे दर्शन घेतल्यानंतर राजे लखुजीराव जाधव यांचे समाधीस्थळ, काळा कोट, रामेश्वर मंदिर यासह शहरातील ऐतिहासिक स्थळांची त्यांनी पाहणी केली. जन्मस्थळ राजवाड्यातील निकृष्ट काम पाहून पुरातत्त्व विभागावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “कामाचा दर्जा पाहायचा असेल तर शिवनेरीवर या,” असे सांगत त्यांनी अधिकाऱ्यांना खडसावले. कोनशिलांवरील माहिती इंग्रजीतही लिहिण्याच्या स्पष्ट सूचनाही त्यांनी दिल्या.
Ajit Pawar death news : ‘दादा मध्यरात्रीही फोन करायचे…’; राजेंद्र शिंगणेंकडून आठवणींना उजाळा
“मी सिंदखेडराजा बोलतोय” या अॅपची माहिती ऐकून त्यांनी ती स्वतः मागवली आणि “जेवढा निधी लागेल तेवढा देतो, पण कामाचा दर्जा सुधारा,” असा स्पष्ट दम भरला. सिंदखेडराजा आणि अजितदादा यांचे ऋणानुबंध असेच घट्ट होत गेले.
डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “अजितदादा हे भावी मुख्यमंत्री होते. ते हयात असते तर जिजाऊंच्या जन्मभूमीचा खऱ्या अर्थाने कायापालट झाला असता. त्यांच्या अकाली निधनाने सिंदखेडराजासह संपूर्ण महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे.”








