Mahayuti government: विवरा शिवारातील शेतरस्त्याचा वाद पेटला; सरकारविरोधात ग्रामस्थ आक्रमक

Farmers protest against administration : तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन, राजकीय पुढाऱ्यांची पाठ

Malkapur विवरा शिवारातील शेतरस्त्याचा दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, या मागणीसाठी शेतकऱ्याने सुरू केलेले उपोषण सहाव्या दिवशीही सुरूच आहे. प्रशासनाकडून कोणताही ठोस निर्णय न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी तहसीलदारांच्या कक्षासमोर ठिय्या आंदोलन करत तीव्र रोष व्यक्त केला.

विवरा शिवारातील शेतरस्त्यावर एका खासगी कंपनीने बेकायदेशीर ताबा घेतल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या रस्त्यावरून शेतकऱ्यांची शेतीकामे, अवजारे तसेच पिकांची वाहतूक होत असते. मात्र रस्ता अडविल्यामुळे शेती व्यवहार ठप्प होण्याची वेळ आली असून, शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

Chandrapur Mayoral Election : चंद्रपूर काँग्रेसमध्ये चाललं तरी काय ? नगरसेवक फोडण्याचा खासदार प्रतिभा धानोरकरांवर माजी जिल्हाध्यक्षांचा थेट आरोप !

या प्रश्नावर यापूर्वीही आंदोलने, निवेदने व प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या. तरीही आजवर कायमस्वरूपी तोडगा न निघाल्याने प्रशासनाच्या उदासीनतेवर ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी सीताराम ढोण यांनी उपोषणाचा पवित्रा घेतला आहे.

लेखी व ठोस आश्वासनाशिवाय आंदोलन मागे घेणार नाही!

शेतरस्त्याच्या प्रश्नावर निर्णय होत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी गुरुवारी सायंकाळी तहसीलदार कार्यालयात ठिय्या आंदोलन छेडले. स्थानिक पुरुष-महिलांनी तब्बल अडीच तास तहसीलदारांच्या कक्षासमोर ठाण मांडून प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध केला.

Mayoral election : महापौर निवडीनंतर अकोला महापालिकेत गोंधळ

तहसीलदार समाधान सोनवणे यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र लेखी व ठोस आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा ठाम पवित्रा आंदोलकांनी घेतल्याने चर्चा निष्फळ ठरली. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून शेतरस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.