Local body elections : ५२५ ग्रामपंचायतींवर प्रशासकराज; लोकशाहीला तात्पुरता ब्रेक?

Administrator rule imposed in 525 gram panchayats : डोणगाव ग्रामपंचायतीचा कार्यकाळ वाढणार की नाही, सस्पेन्स कायम!

Buldhana स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सत्ताधाऱ्यांची अनास्था पुन्हा एकदा उघड होत असून, येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील तब्बल ५२५ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गावगाड्याची सूत्रे थेट प्रशासनाच्या हाती जाणार असून, लोकनिर्वाचित प्रतिनिधींना तात्पुरता रामराम ठोकावा लागणार आहे.

२०२६ मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील ५२५ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपुष्टात येत असून, निवडणूक कार्यक्रम घोषित होईपर्यंत या सर्व ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात येणार आहेत. यामध्ये मेहकर तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ फेब्रुवारी महिन्यात समाप्त होणार असल्याने पंचायत समिती प्रशासनाने प्रशासक नियुक्तीच्या अंमलबजावणीला सुरुवात केली आहे.

Vidarbha Farmers : शेतकरी कर्जमाफीसाठी आकडेमोड सुरू!

कार्यकाळ संपणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये आरेगाव, अंजनी बुद्रुक, बोरी, बोथा, ब्रह्मपुरी, देऊळगाव साकर्शा, देऊळगाव माळी, दादुलगव्हाण, फैजलापूर, घाटनांद्रा, गोमेधर, गजरखेड, गोहोगाव, गणपूर, हिवरा खुर्द, जवळा, कासारखेड, कनका बुद्रुक, लावणा, लोणी गवळी, मादणी, मांडवा समेत डोंगर, मोहना बुद्रुक, मोळा, मोहना खुर्द, नायगाव दत्तापूर, नागापूर, पांगरखेड, शहापूर, सावत्रा, सारशिव, शेलगाव देशमुख, सावंगी वीर, शिवाजीनगर, शेलगाव काकडे, शेंदला, उमरा व विवेकानंद यांचा समावेश आहे.

तालुकानिहाय कार्यकाळ संपणाऱ्या ग्रामपंचायती

बुलढाणा – ५१, देऊळगाव राजा – २६, मलकापूर – ३२, नांदुरा – ४७, खामगाव – ६९, जळगाव जामोद – २३, संग्रामपूर – २६, चिखली – ५९, शेगाव – ३२, मेहकर – ३९, सिंदखेड राजा – ४२ व लोणार – १४ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमले जाणार आहेत.

दरम्यान, नगर, वरुड व विश्वी या ग्रामपंचायतींवरही प्रशासक नियुक्ती करण्यात येणार असून, विस्तार अधिकारी दर्जाचा अधिकारी प्रशासक म्हणून कार्यभार स्वीकारणार आहे.

डोणगाव ग्रामपंचायतीचा कार्यकाळ वाढणार?

डोणगाव ग्रामपंचायतीच्या बाबतीत मात्र चित्र वेगळे आहे. फेब्रुवारीत पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत असला, तरी एका सदस्याच्या वादामुळे ही लढाई गल्ली ते दिल्लीपर्यंत पोहोचली होती. सरपंचपदाची पहिली सभा तब्बल १६ महिन्यांनंतर पार पडली होती. या प्रकरणी मेहकर पंचायत समितीने तहसीलदारांकडे मार्गदर्शन मागितले होते; मात्र त्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडून मार्गदर्शन घेण्याचा सल्ला दिला.

Mahayuti government: निवडणुकांच्या गदारोळात अंगणवाडी सेविकांना मोठा दिलासा!

२० जानेवारी रोजी जिल्हा परिषद प्रशासनाकडून मार्गदर्शन प्राप्त झाले असून, प्रशासक नेमणुकीच्या यादीत डोणगाव ग्रामपंचायतीचे नाव नसल्याने कार्यकाळ वाढीची शक्यता नाकारता येत नाही. डोणगाव ग्रामपंचायतीला मुदतवाढ मिळणार की नाही, याबाबतचे अंतिम चित्र जिल्हा परिषद प्रशासनाच्या पुढील आदेशानंतरच स्पष्ट होणार आहे.