Amravati municipal corporation : आमदार संजय कुटे यांची रणनीती, रवीराणांना घेऊन थेट मुख्यमंत्र्यांपुढे गेले होते

Ravi Rana met CM Fadanvis along with Sanjay Kute, then changed the equations : अमरावती महापालिकेवर भाजपचाच झेंडा; ‘वर्षा’वर महापौर निवडीसह सत्ता स्थापनेवर सखोल चर्चा

Amravati अमरावती महानगरपालिकेतील महापौर निवड तसेच सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत अमरावती महापालिकेतील सध्याची राजकीय स्थिती, संख्याबळाचे गणित, महापौर पदाची निवड प्रक्रिया तसेच आगामी रणनीतीवर सविस्तर आणि सखोल चर्चा करण्यात आली. अमरावती महापालिका निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले जळगाव जामोद चे आमदार माजी मंत्री संजय कुटे यांची रणनीती यशस्वी झाली असून ते युवा स्वाभिमानी पक्षाचे आमदार रवी राणा यांना घेऊन थेट मुख्यमंत्र्यांपुढे उपस्थित झाल्याने अमरावतीत भाजपचा महापौर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजप संघटन मंत्री उपेंद्रजी कोठेकर तसेच अमरावतीचे आमदार रवी राणा, आमदार संजय कुटे उपस्थित होते.
अमरावती महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाची सत्ता स्थापन करण्याबाबत सर्व पातळीवर सकारात्मक वातावरण असून, भाजपचाच महापौर निवडून येणार, असा ठाम विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

 

Sharad Pawar : अजितदादांची इच्छा पूर्ण व्हावी, आज अजित असते तर फिल्डवरच दिसले असते

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेतील राजकीय घडामोडी लक्षात घेता भाजपकडे आवश्यक संख्याबळ उपलब्ध असून, मित्रपक्ष व अपक्ष नगरसेवकांच्या पाठिंब्याने सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. महापौर पदासाठी इच्छुक उमेदवारांबाबतही यावेळी चर्चा झाली असून पक्षश्रेष्ठी योग्य वेळी निर्णय जाहीर करतील, असे संकेत बैठकीतून मिळाले आहेत.

 

 

oath ceremony : राष्ट्रवादीच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चेनेच शपथविधीची घाई?

दरम्यान, अमरावती शहराच्या विकासाच्या दृष्टीने स्थिर आणि सक्षम नेतृत्वाची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ शहरातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाखाली महापालिकेत प्रभावी कारभार केला जाईल, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
या बैठकीनंतर अमरावतीतील राजकीय हालचालींना वेग आला असून महापौर निवड आणि सत्ता स्थापनेबाबत भाजपची भूमिका अधिक ठोस झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे येत्या काळात अमरावती महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाचाच झेंडा फडकणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.