BJP formed the government inspite of not having majority : विरोधकांचा आरोप, बहुमत नसतानाही सत्तास्थापनेचा घाट
Akola स्वतःचे बहुमत नसतानाही भाजपने घोडेबाजार करून महापालिकेत सत्ता स्थापन केली, असा आरोप काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि वंचित बहुजन आघाडीने शुक्रवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत केला. महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी भाजप, एमआयएम आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) यांची अघोषित युती झाल्याची टीकाही विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केली.
या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे आमदार साजिद खान, शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर उपस्थित होते.
भाजपने प्रत्येकी तीन-तीन कोटी रुपये देऊन मते विकत घेतल्याचा गंभीर आरोप आमदार साजिद खान पठाण यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष)च्या नगरसेवकांनी तोंड लपवून मतदान केल्याचा दावाही त्यांनी केला. तसेच एमआयएम या निवडणुकीत तटस्थ राहिल्याचेही सांगण्यात आले. मात्र, आता आम्ही विरोधी पक्ष म्हणून विकासाच्या मुद्द्यांवर ठामपणे लढा देणार असल्याचे विरोधी पक्षांच्या नेत्यांनी स्पष्ट केले.
oath ceremony : राष्ट्रवादीच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चेनेच शपथविधीची घाई?
भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) यांच्यात वैचारिक मतभेद असतानाही राकाँ (श.प.)ने थेट भाजपला मतदान केल्याचा आरोप करण्यात आला. अल्पसंख्यांकबहुल भागात राकाँ (श.प.)ला राकाँ (अजित पवार गट)पेक्षा अधिक मते मिळाली असतानाही भाजपसोबत भूमिका घेतल्याने संभ्रम निर्माण झाला आहे, असेही विरोधकांनी नमूद केले.
सत्ता स्थापनेसाठी झालेल्या बैठकींमध्ये काँग्रेस व शिवसेनेने एमआयएमलाही सोबत घेण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले.
oath ceremony : राष्ट्रवादीच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चेनेच शपथविधीची घाई?
दोन्ही बाजूंनी राजकीय वर्चस्व आणि विकासकामांतून मिळणाऱ्या ‘रसदी’साठी आपली विचारसरणी व धोरणांना तिलांजली देण्यात आल्याचे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. या सत्तासंघर्षात भाजपने बाजी मारल्याचेही बोलले जात आहे.
दरम्यान, आगामी निवडणुकांमध्ये हिंदुत्ववादी, मुस्लिम व दलित मतांचे ध्रुवीकरण आणि खेचाताण यामुळे प्रमुख राजकीय पक्षांमध्ये तीव्र राजकीय संघर्ष पाहायला मिळेल, असा अंदाज राजकीय जाणकारांनी व्यक्त केला आहे.








