Amravati Municipal Corporation : अमरावती महापौरपदासाठी नागपुरात खलबते

Behind-the-scenes discussions in Nagpur over Amravati mayor’s post : पालकमंत्र्यांनी घेतली बैठक; देशमुख, बांबल व अतकरे यांच्यात चुरस

Amravati अमरावती महानगरपालिकेत महायुतीतून भारतीय जनता पक्षाचाच महापौर होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. या पार्श्वभूमीवर महापौरपदासाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी नागपूर येथे भाजपच्या कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. महसूलमंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे विदर्भ संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली.

या बैठकीत महापौरपदासाठी ऋषिकेश देशमुख, मिलिंद बांबल आणि आशिष अतकरे या तीन नावांवर सविस्तर चर्चा झाली. ही नावे अंतिम मान्यतेसाठी राज्य कोअर कमिटीकडे पाठविण्यात येणार असून त्यानंतर अमरावतीचा नवा महापौर निश्चित होणार आहे.

महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक येत्या ६ फेब्रुवारी रोजी होणार असून, आज सोमवार (२ फेब्रुवारी) हा नामनिर्देशन अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे भाजपसाठी ही कोअर कमिटीची बैठक अत्यंत निर्णायक मानली जात आहे.

Akola Airport Development : अकोला विमानतळाला संत गजानन महाराजांचे नाव द्या

भाजपचे विदर्भ संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर यांच्या नागपूर येथील निवासस्थानी झालेल्या बैठकीला आमदार प्रताप अडसड, आमदार प्रवीण तायडे, भाजप शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, ॲड. प्रशांत देशपांडे, तुषार भारतीय, रवींद्र खांडेकर, किरण पातुरकर, जयंत डेहनकर, सुनील खराटे, किरणताई महल्ले, सचिन रासने, गजानन देशमुख, ललित समदूरकर, बादल कुळकर्णी, प्रशांत शेगोकार आदी उपस्थित होते.

Shikshak Bank : निविदा न काढताच शिक्षक बँकेकडून कोट्यवधींची साहित्य खरेदी

यंदा भाजपकडून महापौरपद पुरुष नगरसेवकाला देण्याचा निर्णय झाला असून, अडीच वर्षांनंतर आरक्षणानुसार महिला नगरसेविकेला ही संधी दिली जाणार असल्याची रणनीती ठरविण्यात आली आहे. त्यामुळे ऋषिकेश देशमुख, मिलिंद बांबल किंवा आशिष अतकरे यापैकी एकाच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.