Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून साकारलेल्या कॅन्सर रुग्णालयात महिनाभरात ८०० रुग्णांची तपासणी

chandrapur-pandit-deendayal-cancer-hospital-mungantiwar-initiative : २८० कोटींच्या प्रकल्पातून विदर्भाला आरोग्यदायी दिलासा

Chandrapur : जिल्ह्यात कॅन्सर रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन उभारण्यात आलेले पंडित दीनदयाल कॅन्सर रुग्णालय आज विदर्भातील आदिवासी, ग्रामीण आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी आधाराचे केंद्र ठरत आहे. या रुग्णालयाची संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने पाठपुरावा करत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे रुग्णालयाची भव्य वास्तू पूर्ण झाली आणि अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध होऊ शकल्या, असे सांगितले जाते.

२८० कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या या कॅन्सर रुग्णालयाचे २२ डिसेंबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. टाटा ट्रस्टच्या सहकार्याने साकारलेल्या या प्रकल्पासाठी आवश्यक निधी मिळवणे, प्रशासकीय अडथळे दूर करणे आणि कामाला गती देणे यासाठी सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने प्रयत्न केले होते. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच हा प्रकल्प कागदावर न राहता प्रत्यक्षात साकार झाल्याचे मत आरोग्य क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.

Sudhir Mungantiwar : भुरसे कुटुंब गहिवरले, म्हणाले सुधीरभाऊ आपल्या सहकार्याबद्दल आमच्याकडे शब्द नाही..

अवघ्या एका महिन्यात या रुग्णालयात ८०० हून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, त्यामध्ये ओपीडी सल्लामसलत, नवीन रुग्ण नोंदणी, फॉलो-अप भेटी आणि पुनर्तपासणी यांचा समावेश आहे. चंद्रपूरसह गडचिरोली, भंडारा, वर्धा आणि आसपासच्या जिल्ह्यातील रुग्णांना आता कॅन्सर उपचारांसाठी नागपूर किंवा मुंबईसारख्या मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागत नसल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

या रुग्णालयात कॅन्सरचे वेळेवर निदान होण्यासाठी सीटी स्कॅन, एमआरआय, एक्स-रे, सोनोग्राफी, मॅमोग्राफी आणि इंटरव्हेंशनल रेडिओलॉजीसारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. प्रयोगशाळा आणि औषध विभागामार्फत आतापर्यंत सुमारे ६०० विविध तपासण्या करण्यात आल्या असून, त्यामुळे रुग्णांना जलद आणि अचूक अहवाल मिळत आहेत. ईसीजी आणि ईपी सेवांमुळे उपचारांपूर्वी आवश्यक वैद्यकीय मूल्यांकन सुलभ झाले आहे.

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांनी दिला शब्द अवघ्या दोन महिन्याच्या आत केला पूर्ण ; चिंतलधाबा १००% सौरग्रामकडे

डे-केअर केमोथेरपी सेवेंतर्गत आतापर्यंत ७० हून अधिक केमोथेरपी सायकल पूर्ण करण्यात आल्या आहेत. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत मोफत आणि रोखरहित उपचार उपलब्ध करून दिल्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांना मोठा आधार मिळाला आहे. या सुविधांसाठी निधी आणि यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेतही मुनगंटीवार यांनी सक्रिय सहभाग घेतल्याचे सांगण्यात येते.

तळमजला आणि चार मजल्यांवर उभारण्यात आलेले हे रुग्णालय सुमारे एक लाख चौरस फूट क्षेत्रफळावर पसरले असून, १४० बेड क्षमतेचे अत्याधुनिक कॅन्सर उपचार केंद्र म्हणून कार्यरत आहे. येथे सीटी सिम्युलेटर, मॅमोग्राफी, 3D आणि 4D अल्ट्रासाऊंड, इलास्टोग्राफीसह अल्ट्रासाऊंड, १६ स्लाइस सीटी स्कॅन, स्पेक्ट, दोन रेषीय प्रवेगक, ब्रेकीथेरपी आणि डिजिटल एक्स-रेसारखी प्रगत तंत्रसामग्री उपलब्ध आहे. केमोथेरपी, सर्जिकल ऑन्कोलॉजी आणि आधुनिक प्रयोगशाळा सुविधा या रुग्णालयाच्या उपचार व्यवस्थेचा कणा ठरत आहेत.

Sudhir mungantiwar : केंद्रीय अर्थसंकल्पातून विकसित भारताची स्पष्ट दिशा

 

सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे साकारलेले पंडित दीनदयाल कॅन्सर रुग्णालय हे केवळ चंद्रपूर जिल्ह्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण विदर्भासाठी आरोग्य क्षेत्रातील मैलाचा दगड ठरत असून, ग्रामीण आणि आदिवासी भागातील रुग्णांसाठी हे रुग्णालय जीवनदायी ठरत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

___