
Uddhav-Thackeray-challenges-mahayuti-corporators : १२१ विरुद्ध १०६ चे चुरशीचे गणित; फोडाफोडीच्या भीतीने ‘मातोश्री’ सतर्क
Mumbai मुंबई महानगरपालिकेच्या आगामी महापौर आणि उपमहापौर निवडणुकीसाठी राजकीय आखाडा पूर्णपणे तापला आहे. सत्ताधारी महायुतीकडे बहुमतासाठी आवश्यक आकडा असतानाही, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतल्याने ही लढत आता चुरशीची ठरणार आहे. कोणत्याही परिस्थितीत आपला बालेकिल्ला राखण्यासाठी आणि युतीसमोर तगडे आव्हान उभे करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आपल्या सर्व नगरसेवकांना ‘सतर्क’ राहण्याच्या आणि मुंबई न सोडण्याच्या कडक सूचना दिल्या आहेत.
मुंबई महापालिकेत एकूण २२७ जागांपैकी सध्याची स्थिती पाहता महायुतीचे पारडे जड दिसत असले तरी विरोधकांनी मोट बांधल्यास चित्र बदलू शकते. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्याकडे ११८ नगरसेवक आहेत. त्यात अजित पवार गटाच्या ३ नगरसेवकांची भर पडल्यास हा आकडा १२१ वर जातो. ठाकरे गटाकडे ६५ नगरसेवक असून, त्यांना काँग्रेस (२४), एमआयएम (८), सपा (२), मनसे (६), आणि शरद पवार गट (१) यांची साथ मिळाल्यास हे संख्याबळ १०६ च्या आसपास पोहोचते. बहुमतासाठी ११४ हा जादुई आकडा हवा असून युतीकडे तो सध्या सुरक्षित दिसत आहे.
Mayoral election : काँग्रेसचा लातूरचा गड कायम कारभाऱ्यांची बिनविरोध निवड
निवडणुकीपूर्वी नगरसेवकांची फाटाफूट होऊ नये यासाठी उद्धव ठाकरे यांनी तातडीची बैठक घेतली. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सर्व नगरसेवकांनी मुंबईतच राहावे, असा आदेश देण्यात आला आहे. कोणत्याही राजकीय दबावाला किंवा आमिषाला बळी न पडता पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. माध्यमांमधील चर्चा किंवा पक्षांतराच्या अफवांकडे दुर्लक्ष करून केवळ अधिकृत आदेशांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Anjali Damania, Parth Pawar : पार्थ पवारांना मिळालेल्या ‘क्लीन चिट’ला अंजली दमानियांचे आव्हान
महायुतीकडे स्पष्ट बहुमत असले तरी ठाकरे गटाने उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतल्याने, गुप्त मतदानाचा फायदा उठवण्याचा प्रयत्न होऊ शकतो का? अशी चर्चा सुरू झाली आहे. याउलट, युतीकडूनही ठाकरे गटातील काही नगरसेवकांना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न होऊ शकतात, ही भीती लक्षात घेऊनच ठाकरेंनी नगरसेवकांवर कडक ‘वॉच’ ठेवला आहे.








