
youth-congress-to-gherao-parliament-delhi : लोकशाही बचाव आणि संसदेतील दडपशाहीविरोधात एल्गार; अमरावती विभागीय प्रभारी कपिल ढोके यांचे अकोल्यातून रणशिंग; ‘सतावेध’ राजकीय वृत्त
Akola देशातील सद्यस्थिती, एफस्टिन फाईल प्रकरण आणि संसदेमध्ये विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात १० फेब्रुवारी रोजी दिल्लीत ‘संसद घेराव’ आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनात अकोला जिल्ह्यातून हजारो युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव व अमरावती विभागीय प्रभारी कपिल ढोके यांनी केले.
अकोला येथील स्वराज्य भवन येथे आयोजित युवक काँग्रेसच्या आढावा बैठकीत कपिल ढोके बोलत होते. “देशातील लोकशाही सध्या धोक्यात असून, संसदेत जनसामान्यांचे प्रश्न मांडणाऱ्या विरोधी पक्षांची मुस्कटदाबी केली जात आहे. युवक काँग्रेस या अन्यायाविरोधात सदैव रस्त्यावर उतरली आहे आणि १० फेब्रुवारीला दिल्लीत सरकारविरोधात ताकद दाखवली जाईल,” असे ढोके यांनी ठणकावून सांगितले. रिक्त पदे भरण्यासाठी तातडीने ‘संघटन सृजन अभियान’ राबवण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
Baramati by election : अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोटनिवडणुकीची तयारी सुरू
यावेळी युवक काँग्रेसच्या माध्यमातून नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. कठीण काळातही पक्षाचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचवणाऱ्या युवकांचे नेत्यांनी कौतुक केले. बैठकीला प्रदेश महासचिव अभिलाष प्रकाश तायडे आणि जिल्हाध्यक्ष निनाद मानकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
Mayoral election : मुंबईच्या महापौरपदी रितू तावडे, उपमहापौरपदी संजय घाडी यांची निवड
जिल्ह्यातील सर्व तालुका आणि शहरांमधून कार्यकर्त्यांची फळी दिल्लीकडे रवाना होण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. आगामी महापालिका आणि स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आंदोलनात्मक कार्यक्रमांच्या माध्यमातून युवकांना सक्रिय करण्याची रणनीती आखली गेली आहे. बैठकीला मिलिंद नितोने, नगरसेवक मोहम्मद अब्दुल्ला, स्वप्निल पाठक, रोशन चिंचोळकर, मंगेश दुतोंडे यांसह जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.








