Baramati assembly by election : बारामतीचा वारसदार कोण? बालेकिल्ल्यात राजकीय हालचालींना वेग;

ajit-pawar-demise-voter-list-revision-sunetra-pawar : मतदार यादी पुनरीक्षणाचे काम सुरू; नव्या नेतृत्वाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष

Baramati महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते अजितदादा पवार यांच्या अकस्मात निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. अजितदादांनंतर बारामतीची धुरा कोणाच्या खांद्यावर असणार? हा प्रश्न आता ऐरणीवर आला असून, प्रशासकीय पातळीवर मतदार यादी अद्ययावत करण्याच्या कामाला वेग आला आहे. या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने सुनेत्रा पवार यांचे नाव आघाडीवर असल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

निवडणूक आयोगाने बारामती पोटनिवडणुकीसाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. १ जानेवारी २०२६ हा अर्हता दिनांक निश्चित करण्यात आला असून प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. नवीन मतदारांना नाव नोंदणीसाठी आणि जुन्या दुरुस्तीसाठी विशिष्ट कालावधी देण्यात आला आहे. पारदर्शक निवडणुकीसाठी प्रशासन सर्व राजकीय पक्षांशी समन्वय साधत आहे. दावे आणि हरकतींची विल्हेवाट लावल्यानंतर लवकरच अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

District and session court : शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल दातकरांसह ११ जण निर्दोष

गेल्या अनेक दशकांपासून बारामती हा पवार कुटुंबाचा अभेद्य गड राहिला आहे. अजितदादांनी या मतदारसंघाचा कायापालट करत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनामुळे निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्याचे मोठे आव्हान आता राष्ट्रवादी काँग्रेससमोर आहे. अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव सध्या संभाव्य उमेदवार म्हणून राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चेत आहे. कौटुंबिक वारसा आणि स्थानिक जनसंपर्क यामुळे त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतरच सर्व पक्ष आपल्या अधिकृत उमेदवारांची घोषणा करण्याची शक्यता आहे.

Vidarbha State demand : पर्यटन व औद्योगिक विकासाकडे दुर्लक्ष, विदर्भाच्या अस्तित्वासाठी लढा

ही पोटनिवडणूक केवळ एका जागेपुरती मर्यादित नसून ती आगामी विधानसभेची दिशा ठरवणारी असेल. बारामतीकर अजितदादांनंतर कोणाला कौल देतात, यावर राज्याच्या राजकारणातील अनेक समीकरणांचे भविष्य अवलंबून आहे. सत्तेतील मित्रपक्ष आणि विरोधक या पोटनिवडणुकीत काय भूमिका घेतात, याकडेही राजकीय विश्लेषकांचे डोळे लागले आहेत.