
maharashtra-12-zilla-parishad-result-2026-full-results : 12 जिल्हा परिषदांचे निकाल; पहा कुठे-कुणाची सत्ता?
Mumbai : राज्यातील 12 जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्ह्यांचा यात समावेश आहे. या निवडणुकीत एकूण 7 हजार 438 उमेदवार रिंगणात होते. जिल्हा परिषदांच्या 731 आणि पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी मतदान झालं होतं.
मतमोजणीनंतर राज्यातील स्थानिक राजकारणाचं चित्र स्पष्ट झालं असून काही जिल्ह्यांत सत्ताधारी पक्षांना धक्का बसला आहे, तर काही ठिकाणी प्रस्थापित राजकीय पक्षांनी आपली पकड कायम ठेवली आहे.
रायगड जिल्हा परिषद निकाल: एकूण 59 जागांपैकी 50 जागांचे निकाल जाहीर झाले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी 16 जागांसह आघाडीवर आहेत. भाजपला 12 जागा मिळाल्या असून शिवसेना ठाकरे गटाला 5 आणि काँग्रेसला 1 जागा मिळाली आहे.
Baramati assembly by election : बारामतीचा वारसदार कोण? बालेकिल्ल्यात राजकीय हालचालींना वेग;
रत्नागिरी जिल्हा परिषद निकाल: एकूण 56 जागांमध्ये शिंदे गटाच्या शिवसेनेने वर्चस्व मिळवत 36 जागा जिंकल्या. भाजपला केवळ 2 जागांवर समाधान मानावं लागलं. राष्ट्रवादी अजित पवार गटाला 4, ठाकरे गटाला 1 तर मनसेला 1 जागा मिळाली.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निकाल: एकूण 50 पैकी 36 जागांचे निकाल जाहीर झाले. भाजपने 21 जागांवर विजय मिळवत आघाडी घेतली आहे. शिवसेनेला 8, ठाकरे गटाला 2 तर 5 अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.
District and session court : शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल दातकरांसह ११ जण निर्दोष
पुणे जिल्हा परिषद निकाल: 73 पैकी 64 जागांचे निकाल जाहीर झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसने 43 जागा जिंकत स्पष्ट वर्चस्व मिळवलं आहे. भाजपला 8, ठाकरे गटाला 7, शिवसेनेला 5 आणि शरद पवार गटाला 1 जागा मिळाली आहे.
सातारा जिल्हा परिषद निकाल: एकूण 65 जागांपैकी भाजपने 32 जागा जिंकत आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला 18 तर शिवसेनेला 10 जागा मिळाल्या आहेत.सांगली जिल्हा परिषद निकाल: एकूण 61 जागांमध्ये भाजप 18 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाला 15, काँग्रेसला 11, शिंदे गटाच्या शिवसेनेला 7 तर अजित पवार गटाला 7 जागा मिळाल्या आहेत. इतर पक्ष आणि संघटनांनाही प्रतिनिधित्व मिळालं आहे.
Vidarbha State demand : पर्यटन व औद्योगिक विकासाकडे दुर्लक्ष, विदर्भाच्या अस्तित्वासाठी लढा
कोल्हापूर जिल्हा परिषद निकाल: एकूण 68 जागांपैकी 59 जागांचे निकाल जाहीर झाले. राष्ट्रवादी काँग्रेस 16 जागांसह आघाडीवर असून काँग्रेसला 13 आणि भाजपला 12 जागा मिळाल्या आहेत. स्थानिक आघाड्या आणि संघटनांचाही प्रभाव दिसून आला आहे.
सोलापूर जिल्हा परिषद निकाल: एकूण 68 जागांमध्ये भाजपने 37 जागा जिंकत स्पष्ट बहुमताकडे वाटचाल केली आहे. राष्ट्रवादीला 9, शिवसेनेला 7 तर 3 जागांवर इतर उमेदवार विजयी झाले आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निकाल: एकूण 63 जागांमध्ये भाजप 22, शिवसेना 19 आणि ठाकरे गट 8 जागांसह पुढे आहेत. अपक्षांनी 7 जागांवर विजय मिळवला आहे.
परभणी जिल्हा परिषद निकाल: एकूण 54 पैकी 43 जागांचे निकाल जाहीर झाले. भाजप 21 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाला 11, शिवसेनेला 5 तर ठाकरे गट आणि काँग्रेसला प्रत्येकी 3 जागा मिळाल्या आहेत.
धाराशिव जिल्हा परिषद निकाल: एकूण 55 पैकी 41 जागांचे निकाल जाहीर झाले. भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना प्रत्येकी 12 जागांसह आघाडीवर आहेत. ठाकरे गटाला 5 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 5 जागा मिळाल्या आहेत.
लातूर जिल्हा परिषद निकाल: एकूण 59 जागांमध्ये काँग्रेसने 23 जागा जिंकत पहिलं स्थान मिळवलं आहे. भाजपला 18 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 12 जागा मिळाल्या आहेत.
या निकालांमुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात नवे सत्तासमीकरण तयार झालं असून आगामी काळात सत्ता स्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.
____








