chandrapur-mayor-election-2026-sudhir-mungantiwar-strategy-sangeeta-khandekar-bjp-masterstroke : संदीप गिऱ्हे यांच्या नेतृत्वातील उबाठा गटाने दिले भाजपाला समर्थन
Chandrapur : चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी निवड प्रक्रिया सुरू असून, या निवडणुकीने राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. स्पष्ट बहुमत कुणाकडेही नसताना, शेवटच्या टप्प्यात भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी टाकलेला निर्णायक डाव राजकीय यशस्वी ठरत आहे. भाजपकडून संगीता खांडेकर यांचे नाव महापौरपदासाठी निश्चित करण्यात आले, त्यांच्या गळ्यात विजयाची माळ पडणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे.
महानगरपालिकेच्या सत्तासंघर्षात भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांना मतदारांनी स्पष्ट कौल दिलेला नाही. त्यामुळे
संदीप गिऱ्हे यांच्या नेतृत्वातील उबाठा गटाने दिलेल्या समर्थनामुळे भाजपाचा झेंडा चंद्रपूर महानगरपालिकेवर फडकेल हे जवळपास निश्चित झाले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपकडून संगीता खांडेकर यांचे नाव अधिकृत उमेदवार म्हणून निश्चित करण्यात आले.पक्षाची संपूर्ण ताकद खांडेकर यांच्या पाठीशी उभी राहिली आहे.
Maharashtra politics : देवेंद्र फडणवीसांचा रात्रीचा गुप्त दिल्ली दौरा, पहाटे मुंबईत परतले!
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्यावर विश्वास टाकून भाजपापाचा झेंडा चंद्रपूर महानगरवर पालिकेवर फडकावा यासाठी जबाबदारी दिली होती. नगरसेवकांची कमी संख्या असूनही सत्ता बसवण्यात आमदार सुधीर मुनगंटीवार हे यशस्वी झाले आहे.
या उलट काँग्रेस गोटात मात्र अंतर्गत गटबाजीचा फटका बसला आहे. वडेट्टीवार आणि धानोरकर गटातील संघर्ष, नगरसेवकांच्या नाराजीपासून ते गटनोंदणीच्या वादांपर्यंतचे प्रकरण थेट दिल्लीपर्यंत पोहोचले. मात्र, तेथून आलेल्या तोडग्यावरही एकमत न झाल्याने काँग्रेसमधील धुसफूस अधिकच चिघळली. सत्तेसाठी आवश्यक असलेले ३४ चे संख्याबळ जुळवताना काँग्रेसला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या सगळ्या राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार असल्याचे समोर आले आहे. काँग्रेसमधील अंतर्गत संघर्षाचा अचूक अंदाज घेत त्यांनी शेवटच्या क्षणी मास्टरस्ट्रोक खेळण्याचे समोर आले आहे. सर्वाधिक जागा मिळवूनही सत्ता स्थापन करण्यात अडचणीत सापडलेल्या काँग्रेससमोर भाजपने निर्णायक आव्हान उभे केले त्यामुळे सत्तेचे पारडे हळूहळू भाजपच्या बाजूने झुकताना दिसले. आणि आज योग्य रणनिती मुनगंटीवार यांनी आखत सत्ता बसविण्यात निर्णायक भूमिका बजावली आहे.
Tri language policy : त्रिभाषा धोरण समितीचा अहवाल शासनाकडे सादर
महापालिकेच्या महापौर निवडीचा अंतिम निकाल काही तासांत स्पष्ट होणार असला, तरी सध्याच्या राजकीय गणितांवरून संगीता खांडेकर यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडणार हे निश्चित झाले आहे. गड जिंकूनही अंतर्गत गृहयुद्धामुळे सत्ता हातातून जाण्याची वेळ काँग्रेसवर आल्याची स्पष्ट चिन्हे असताना, मुनगंटीवारांच्या रणनीतीमुळे चंद्रपूरच्या राजकारणात मोठा उलटफेर घडल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या हा विषय जोरदार चर्चेचा ठरत आहे.








