Congress-youth-leader-opposition-leader-in-corporation : डॉ. झिशान हुसेन यांची गटनेता म्हणून निवड; अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाची अधिकृत मोहोर
Akola महापालिकेतील काँग्रेस पक्षाचे युवा, अभ्यासू आणि सक्रिय नगरसेवक डॉ. झिशान हुसेन यांना महापालिकेत विरोधी पक्षनेतेपद मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाने त्यांच्या नावाला अधिकृत मान्यता दिली असून, काँग्रेस पक्षाने एकमताने त्यांची गटनेतेपदी निवड केली आहे.
अकोला महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष सर्वाधिक नगरसेवक निवडून आणणारा पक्ष ठरला असून, काँग्रेस पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आहे. काँग्रेसच्या एकूण २१ नगरसेवकांनी विजय मिळवला आहे. पक्षातील सर्व नगरसेवकांनी एकमताने डॉ. झिशान हुसेन यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत विरोधी पक्षनेतेपदासाठी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांच्या नियुक्तीवर अधिकृत मोहोर उमटवण्यात आली.
Nagpur Municipal Corporation : अखेर एमआयएम-मुस्लिम लीगची युती, काँग्रेसचे प्रयत्न फसले
राजकीय विश्लेषकांच्या मते, डॉ. हुसेन यांची निवड ही महापालिकेतील युवा नेतृत्वाची झलक असून काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक स्थैर्याचे प्रतीक मानली जात आहे. विरोधी पक्षनेतेपदावर त्यांची नियुक्ती झाल्यास महापालिकेत जनहिताशी संबंधित मुद्द्यांवर अधिक प्रभावीपणे भूमिका मांडता येईल, असा पक्षाचा विश्वास आहे.
Rohit pawar : अजितदादांचा घातपात की अपघात? पायलट बदल, मेंटेनन्स अहवालावर संशय
युवा नेतृत्वाच्या सहभागामुळे महापालिकेतील राजकीय वातावरणात सकारात्मक बदल अपेक्षित असून, डॉ. झिशान हुसेन यांची कार्यशैली पारदर्शक, लोकाभिमुख आणि अभ्यासपूर्ण असल्याची प्रतिक्रिया नगरसेवकांसह नागरिकांकडून व्यक्त होत आहे. या राजकीय घडामोडीमुळे अकोला महापालिकेत काँग्रेस पक्षाची भूमिका अधिक ठाम होण्याची तसेच लोकहिताचे निर्णय अधिक प्रभावीपणे राबवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.








