Zilla Parishad elections : शेगावमध्ये शिवसेनेचा ‘निर्धार’; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी बांधली कंबर!

shegaon-shivsena-meeting-zilla-parishad-election-preparation : बूथ स्तरावर यंत्रणा सक्षम करण्याचे कार्यकर्त्यांना आदेश; जिल्हाप्रमुखांच्या नेतृत्वात आढावा बैठक

Shegao आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. शेगाव येथील विश्राम भवनमध्ये शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी आणि शाखाप्रमुखांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकांमध्ये पक्षाचा भगवा फडकवण्यासाठी संघटनात्मक बांधणी अधिक भक्कम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

जिल्हाप्रमुख संतोष पाटील डिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. प्रत्येक बूथवर पक्षाची पकड घट्ट करण्यासाठी ‘बूथ प्रमुख’ आणि कार्यकर्त्यांना विशेष जबाबदाऱ्या देण्यात आल्या. शासकीय योजना आणि पक्षाची धोरणे तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्यक्ष गृहसंपर्क वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. शेगाव तालुका आणि परिसरातील शेतकऱ्यांचे प्रश्न, विकासकामे आणि बेरोजगारी या मुद्द्यांवर निवडणुकीत आक्रमक भूमिका मांडण्याचे निश्चित करण्यात आले.

Gram Panchayat Elections : प्रशासक राजला ‘ब्रेक’! ग्रामपंचायतींवरील नियुक्तीला उच्च न्यायालयाची स्थगिती

जिल्हाप्रमुख संतोष पाटील डिवरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, “निवडणुका जिंकण्यासाठी केवळ उत्साह असून चालणार नाही, तर शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि सक्रिय संघटन आवश्यक आहे.” यावेळी तालुकाप्रमुख चेतन पाटील, रामा पाटील थारकर यांच्यासह युवा सेना आणि महिला आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.