Khamgao Municipal Council : खामगाव नगरपरिषदेचा ‘बुलढाणा पॅटर्न’; पहिल्याच सभेत विकासकामांचा धडाका!

khamgaon-municipal-council-first-special-meeting-all-resolutions-passed : जनुना तलाव ‘वॉटर पार्क’ आणि उत्पन्न वाढीसाठी व्यापारी संकुलांना मंजुरी

Khamgao नव्याने अस्तित्वात आलेल्या खामगाव नगरपरिषदेच्या पहिल्या विशेष सभेने शहराच्या विकासाची दिशा निश्चित केली आहे. प्रशासकीय इमारतीत पार पडलेल्या या बैठकीत राजकीय मतभेद बाजूला सारत विषयपत्रिकेवरील सर्व ठरावांना एकमताने मंजुरी देण्यात आली. नगराध्यक्षा अपर्णा फुंडकर यांच्या नेतृत्वाखालील या पहिल्याच बैठकीत शहराचा कायापालट करणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना हिरवा कंदील मिळाल्याने खामगावकरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

सभेची सुरुवात दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली वाहून शोकप्रस्तावाने करण्यात आली. त्यानंतर प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. नगरपरिषदेच्या विविध विभागांसाठी लागणारी सामग्री आणि सेवांच्या वार्षिक निविदा प्रक्रियेला मान्यता देण्यात आली. सन २०२६–२७ या आगामी आर्थिक वर्षासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांतर्गत होणाऱ्या विकासकामांच्या आराखड्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

Malkapur Municipal Council : मलकापूर पालिकेत विकासकामांचा धडाका; शहर हद्दवाढीसह ७३ ठरावांना मंजुरी!

नगरपरिषदेची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी नगराध्यक्षांनी उत्पन्नाचे नवे स्रोत शोधण्यावर भर दिला आहे. शहरातील प्रमुख भागात नवीन व्यापारी संकुले आणि शिस्तबद्ध फेरीवाला क्षेत्र (Hawkers Zone) विकसित करण्याचा निर्णय झाला. आठवडी बाजार आणि गांधी बागेसमोरील प्रस्तावित दुकाने ३० वर्षांच्या दीर्घ मुदतीसाठी भाडेतत्त्वावर देण्याच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली, ज्यामुळे पालिकेला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणार आहे.

Bacchu kadu on government : भाजपच्या ‘टेंडर’ राजकारणाने व्यवस्थेचा सत्यानाश; बच्चू कडूंचा सरकारवर हल्लाबोल!

खामगावचे वैभव असलेल्या जनुना तलावाचा कायापालट करण्यासाठी सभेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जनुना तलाव परिसरात वॉटर पार्क, मनोरंजन उद्यान आणि आधुनिक ‘फूड कोर्ट’ उभारण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. या प्रकल्पांचे संचालन, देखभाल आणि दुरुस्ती खासगी लोकसहभागातून (PPP) करण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला. शहरात ‘बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान’ अधिक प्रभावीपणे राबवून मूलभूत सुविधांचा दर्जा सुधारण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.