Zilla Parishad elections : झेडपीत भाजपचे ‘कमबॅक’ होणार का? जिल्हाध्यक्षांपुढे घाटावरील ‘गडा’चे आव्हान!

buldhana-zp-election-2026-bjp-district-president-vijayraj-shinde-challenges-ghat-region-strategy : चिखली वगळता घाटावर कमळ सुकले; शिंदेसेनेच्या वाढत्या प्रभावामुळे भाजपची कोंडी

Buldhana बुलढाणा जिल्ह्यात आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला ‘घाटावरील’ भागात (बुलढाणा, चिखली, मेहकर, सिंदखेड राजा) अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही.

चिखलीचा बालेकिल्ला शाबूत असला तरी, उर्वरित भागात पक्षाची पीछेहाट झाली आहे. या पार्श्वभूमीवर, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्यासमोर आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाचे ‘कमबॅक’ घडवून आणण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

घाटाखालील भागाच्या (खामगाव, मलकापूर, शेगाव) तुलनेत घाटावरील भागात भाजपचे संघटन कमकुवत असल्याचे चित्र आहे. बुलढाणा शहरात शिंदेसेनेने केलेल्या राजकीय खेळीमुळे भाजपला यशाने हुलकावणी दिली. मेहकरमध्येही शिंदेसेनेचे प्राबल्य असल्याने भाजपची तिथे डाळ शिजलेली नाही.

Dilip Sananda : खामगावात करवाढीचा वणवा; सानंदांच्या ‘सामूहिक लढ्या’च्या हाकेला साथ मिळणार का?

सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे (अजित पवार आणि शरद पवार गट) वर्चस्व असल्याने भाजपला तिथे तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागत आहे. नगरपालिका निवडणुकीत भाजपमधील काही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी छुप्या पद्धतीने शिंदेसेनेला साथ दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. ही गटबाजी रोखणे हे विजयराज शिंदे यांच्यासमोरील पहिले आव्हान असेल.

Nandura APMC : नांदुरा बाजार समितीत ‘सव्वा वर्षाचा फॉर्म्युला’ रखडला; काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी उफाळली!

चार दशकांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव पाठीशी असलेल्या विजयराज शिंदे यांनी या आव्हानाचा सामना करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. आगामी रणनीती ठरवण्यासाठी शिंदे यांनी मुंबईत पक्षश्रेष्ठींशी भेटीगाठी वाढवल्या आहेत. जिल्ह्यासाठी विशेष ‘रोडमॅप’ तयार करण्यावर त्यांचा भर आहे. नाराज निष्ठावंतांची मनधरणी करणे आणि तरुण कार्यकर्त्यांना जिल्हा परिषदेच्या रिंगणात उतरवून नवीन नेतृत्व उभे करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. महायुतीमध्ये जिल्हा परिषदेच्या जागांचे वाटप करताना भाजप आपला सन्मानजनक वाटा कसा पदरात पाडून घेते, यावर बरेच काही अवलंबून असेल.

Mahayuti Government : गावगाड्याची धुरा ‘मुदत संपलेल्या’ सरपंचांकडेच ठेवा; पर्यायी व्यवस्थेची मागणी

चिखलीमध्ये आमदार श्वेताताई महाले यांच्या नेतृत्वाखाली भाजपने आपली पकड मजबूत ठेवली असली तरी, केवळ एका मतदारसंघावर जिल्हा परिषदेची सत्ता मिळवणे कठीण आहे. मेहकर, सिंदखेड राजा आणि बुलढाणा या तीन विधानसभा मतदारसंघांत भाजपला आपला टक्का वाढवावा लागेल.