nagpur-muslim-community-tribute-to-chhatrapati-shivaji-maharaj-communal-harmony : नागपुरात सामाजिक एकतेचा वस्तुपाठ; रोजा आटोपल्यानंतर मुस्लिम बांधव शिवरायांच्या चरणी नतमस्तक
Nagpur औरंगजेबाच्या कबरीच्या वादावरून नागपुरात निर्माण झालेला तणाव आणि दंगलीच्या जखमांवर फुंकर घालत, नागपुरातील मुस्लिम समाजाने सामाजिक एकतेचा एक नवा वस्तुपाठ घालून दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून, महाल परिसरातील शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मुस्लिम बांधवांनी अभिवादन केले आणि शहरात सामाजिक समतेचा संदेश दिला.
महिला काँग्रेस कमिटीच्या सचिव नॅश नुसरत अली यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी उपस्थित वक्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे, न्यायप्रियतेचे आणि राष्ट्रनिर्माणातील त्यांच्या योगदानाचे स्मरण केले. “शिवाजी महाराज हे केवळ एका विशिष्ट समाजाचे राजे नसून ते संपूर्ण देशाचा अभिमान आहेत. त्यांच्या सैन्यात अठरा पगड जातींचे लोक होते, त्यांनी कधीही हिंदू-मुस्लिम असा भेदभाव केला नाही,” असे विचार यावेळी व्यक्त करण्यात आले.
ATS Operation : दहशतवादी संघटनेत युवकांची भरती, एटीएसची मोठी कारवाई
विशेष म्हणजे, आजपासून पवित्र रमजान महिन्याला सुरुवात झाली आहे. दिवसभराचा रोजा आटोपल्यानंतर सर्व मुस्लिम बांधवांनी एकत्र येत महाराजांच्या चरणी नतमस्तक होणे पसंत केले. महाराजांचा आदर्श समोर ठेवून सर्व जाती-धर्माच्या लोकांनी गुण्यागोविंदाने राहावे आणि शहराचे ऐक्य कायम राखावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
Nitin Gadkari : नितीन गडकरी यांची इंस्टाग्रामवरून बदनामी, सायबर पोलिसांनी केले हँडलरवर गुन्हे दाखल
या प्रसंगी हाफिज पठाण, मोहसिन खान, शानू शेख, आसिफ भाई, अजहर शेख, विशाल भाई, नकील अहमद, यश भाई, साजिद भाई आणि सादिक अली यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वर्षभरापूर्वी ज्या पुतळ्याच्या परिसरातून वादाला सुरुवात झाली होती, त्याच ठिकाणी आज एकतेचा जयघोष पाहायला मिळाला.








