Uddhav-Thackeray-No-objection-to-BJP–Shivsena-alliance-in-Chandrapur-Municipal-Corporation : चंद्रपूर महापालिकेतील भाजप-उद्धव सेना युतीला ठाकरेंची मान्यता
Chandrapur उद्धव ठाकरे सेनेने भाजप सोडून कोणासोबतही युती करण्याची मुभा नगरसेवकांना दिली होती. मात्र चंद्रपूरमध्ये वेगळेच घडले. भाजपसोबत उद्धव सेनेच्या नगरसेवकांनी सत्ता स्थापन केली. यावरून काँग्रेसने उद्धव सेनेला धारेवर धरले होते. या सर्व राजकीय घडामोडीनंतर प्रथमच उद्धव ठाकरे यांनी चंद्रपूरच्या सर्व नगरसेवकांना मंगळवारी मातोश्रीवर बोलावून घेतले होते. ते सर्वांची कान उघडणी करतील अशी भीती शिवसैनिकांना वाटत होती.
मात्र उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाचे अस्तित्व कायम ठेवा असा सल्ला देऊन सर्वांना आशीर्वाद दिला. त्यामुळे सर्वच नगरसेवकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सत्तेत जाणे चुकीचे नाही अशी पुस्ती जोडल्याने त्यांनी भाजप-उद्धव सेनेच्या युतीला एक प्रकारे मान्यताच दिली असल्याचे बोलले जाते.
Ajit Pawar plane accident : पोलीस ठाण्यात तणाव; रोहित पवार, अमोल मिटकरी यांची पोलिसांशी बाचाबाची !
चंद्रपूर महापालिकेच्या निवडणुकीत उद्धव सेनेचे फक्त सहा नगरसेवक निवडून आले होते. वंचित बहुजन आघाडीच्या दोन नगरसेवकांना सोबत घेऊन त्यांनी गटनोंदणी करून आपले संख्याबळ वाढवले. सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नव्हते. ही बाब हेरून उद्धव सेनेच्या नगरसेवकांनी महापौर पदावर दावा केला होता. काँग्रेसमध्ये आधीच महापौरपदावरून विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यात रस्सीखेच सुरू होती.
हा वाद दिल्लीपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे काँग्रेसने सेनेची महापौरपदाची मागणी फेटाळून लावली. स्थायी समितीचे सभापतिपद देण्याचे आश्वासन दिले होते. या वादाचा फयदा भाजपने उचलला. सव्वा वर्षानंतर महापौरपद, दोन वेळा स्थायी समितीचे सभापतिपद आणि उपमहापौर असा प्रस्ताव उद्धव सेनेला दिला. तो मान्य झाल्याने भाजपची मोहीम यशस्वी झाली. भाजपचा महापौरपदाचा उमेदवार एक मताने विजयी झाला.
Devendra fadnavis : आर्थिक शिस्तीचा पहिला निर्णय; देवेंद्र फडणवीस यांची पुरवणी मागण्यांवर कात्री
यामुळे काँग्रेसचे नेते चांगलेच भडकले होते. सपकाळांनी गद्दारी केली असा आरोप करून परभणीमध्ये बदला घेऊन असा इशाराही दिला होता. प्रत्यक्षात परभणीमध्ये काँग्रेसच्या नगरसेवकांनी मुकाट्याने उद्धव सेनेला पाठिंबा दिला. चंद्रपूरच्या पराभवाचे खापर शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसवरच फोडले. तुमच्याच नेत्यांमधील भांडणामुळे पराभव झाल्याचा आरोप त्यांनी केला. या सर्व घडामोडीनंतर उद्धव ठाकरे सेना नगरसेवकांवर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.








