sunetra-pawar-to-be-candidate-for-baramati-by-poll-election : राष्ट्रवादी कोअर कमिटीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
Baramati बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने (एनसीपी) उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेसाठी पक्षाने एकमताने सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर केली. मुंबईत झालेल्या पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत सुनेत्रा पवार स्वतः उपस्थित होत्या आणि निर्णय एकमताने झाल्याची माहिती पक्षातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर बारामती विधानसभा जागा रिक्त झाली. अजित पवार हे आठ वेळा आमदार आणि सहा वेळचे उपमुख्यमंत्री होते. त्यांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली. सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली असून, आता त्यांना विधानसभेचे सदस्यत्व मिळवण्यासाठी पोटनिवडणूक लढावी लागणार आहे. घटनेनुसार, उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यांच्या आत विधानसभेत निवडून येणे आवश्यक आहे.
Chandwad APMC : कांदा-मका भावघसरणीचे संकट; शेतकऱ्यांचे आमरण उपोषण
कोअर कमिटीच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीबरोबरच पार्थ पवार यांना आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून अंतिम करण्यात आले. प्रफुल्ल पटेल यांच्या मुंबईतील निवासस्थानी झालेल्या या बैठकीत राज्याचे एनसीपी अध्यक्ष सुनील तटकरे आणि इतर प्रमुख नेते उपस्थित होते. पक्षाने ही पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले जात आहे. बारामतीत अजित पवार यांच्या निधनानंतर सहानुभूतीची लाट असल्याने इतर पक्ष उमेदवार उभे करणार नाहीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
निवडणूक आयोगाने बारामती पोटनिवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरावलोकनाची प्रक्रिया सुरू झाली असून, १ जानेवारी २०२६ पर्यंत नोंदणीकृत मतदार मतदान करू शकतील. मतदार यादीचा अंतिम मसुदा १० मार्च २०२६ रोजी प्रसिद्ध होईल. निवडणुकीची अधिसूचना कधीही जाहीर होऊ शकते.
Mahayuti Government : महाराष्ट्र नगरपरिषद निवडणुकीसाठी नवीन नियम
बारामती ही पवार कुटुंबाची पारंपरिक जागा आहे. अजित पवार यांनी अनेक वर्षे येथून निवडणूक जिंकली होती. सुनेत्रा पवार यांनी राज्य सभेतून प्रवास सुरू केला असला तरी आता विधानसभेत प्रवेश घेण्याची संधी मिळाली आहे. पक्षातील नेत्यांचे मत आहे की, सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीमुळे बारामतीत एनसीपीची ताकद कायम राहील आणि अजित पवार यांच्या वारसाला न्याय मिळेल. तसेच आगामी राज्यसभा निवडणुकीत पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील, असा निर्णय पक्षाकडून घेण्यात आल्याची माहिती देखील मिळाली आहे आहे. सोमवारी २३ फेब्रुवारी रोजी रात्री मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या झालेल्या पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती मिळाली आहे.








