israel-missile-strike-assembly-of-experts-iran-top-leadership-crisis : अली खामेनेई यांच्या निधनानंतर इराणच्या टॉप लीडरशिपला मोठा फटका?
New Delhi: पश्चिम आशियातील तणाव शिगेला पोहोचला असताना इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षाने धक्कादायक वळण घेतल्याचा दावा केला जात आहे. इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पदासाठी नव्या सर्वोच्च नेत्याची निवड करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या तज्ञांच्या बैठकीवर इस्रायलने क्षेपणास्त्र हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेत इराणच्या वरिष्ठ नेतृत्वाला मोठा फटका बसल्याची चर्चा आहे.
इराणची राजधानी तेहरान आणि पवित्र शहर कोम येथे मोठे स्फोट झाल्याचे वृत्त आहे. सर्वोच्च नेत्याची निवड करणाऱ्या ८८ सदस्यीय सभेची बैठक अत्यंत गुप्ततेत पार पडत असताना सभास्थळालाच लक्ष्य करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. सर्व सदस्य उपस्थित होते की नाही याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नसली तरी मोठ्या संख्येने वरिष्ठ धर्मगुरू आणि राजकीय नेते त्या ठिकाणी उपस्थित असल्याचे सांगितले जात आहे.
Amravati Municipal Corporation : अमरावती महापालिकेच्या तिजोरीची चावी कुणाकडे?
या पार्श्वभूमीवर इस्रायलने यापूर्वी इराणमधील राष्ट्रपती भवन, सुप्रीम नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलची इमारत तसेच लष्कराचे मुख्यालय यांसारख्या महत्त्वाच्या स्थळांवर कारवाई केल्याचे दावे करण्यात आले होते. नव्या हल्ल्यामुळे इराणच्या सत्ताकारणातील पहिल्या आणि दुसऱ्या फळीतील नेतृत्वावर गंभीर परिणाम झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
इराणी सूत्रांच्या माहितीनुसार, नव्याने नियुक्त संरक्षण मंत्री अल रेझाही यांच्यासह काही वरिष्ठ नेते या हल्ल्यात ठार झाल्याचे सांगितले जात आहे. सध्या राष्ट्रपती मसूद पेझेश्कियान, सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख गुलाम हुसेन मोहसनी एजई आणि गार्डियन कौन्सिलचे सदस्य अली रझा आराफी यांसारखे मोजकेच वरिष्ठ नेते कार्यरत असल्याची चर्चा आहे. मात्र या सर्व दाव्यांबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
सर्वोच्च नेत्याच्या निवडीची प्रक्रिया निर्णायक टप्प्यावर असताना झालेल्या या हल्ल्यामुळे इराणमध्ये नेतृत्व रिक्ततेची भीती निर्माण झाली आहे. देशातील राजकीय स्थैर्य, लष्करी धोरण आणि आंतरराष्ट्रीय संबंध यांवर याचा दूरगामी परिणाम होऊ शकतो. दरम्यान, या हल्ल्यात शेकडो लोकांचा मृत्यू झाल्याचे दावे केले जात असले तरी अधिकृत आकडेवारी समोर आलेली नाही.
Buldhana Politics : बुलढाण्यात राष्ट्रवादी पुन्हा ‘अॅक्टिव्ह मोड’मध्ये?; संघटनबांधणीला वेग
मध्यपूर्वेतील हा संघर्ष अधिक तीव्र होत चालला असून त्याचे परिणाम केवळ प्रादेशिक पातळीपुरते मर्यादित राहणार नाहीत, अशी भीती व्यक्त केली जात आहे. जागतिक राजकारण आणि अर्थव्यवस्थेवरही या घडामोडींचे पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.








