political-hand-suspected-in-attack-on-shivsena-thackeray-city-leader : पोलीस अधीक्षकांना कुणबी समाजाचे निवेदन; चौकशी करण्याची मागणी
Akola शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख राहुल कराळे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी मुख्य सूत्रधार व त्याला राजकीय पाठबळ देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, अशी मागणी कुणबी समाज, अकोला यांच्या वतीने पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, राहुल कराळे हे मागील १५ वर्षांपासून राजकारणात सक्रिय असून, राजकीय द्वेषातून १ मार्च २०२६ रोजी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या घटनेप्रकरणी सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चार आरोपींना अटकही करण्यात आली आहे.
Akola Municipal Corporation : ८ जागांसाठी ५० इच्छुक; ८७ नामनिर्देशनपत्रांचे वितरण
मात्र, हल्ल्याचा मुख्य सूत्रधारास अद्याप आरोपी करण्यात आले नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सराईत गुन्हेगाराची पार्श्वभूमी असलेल्या मुख्य सूत्रधाराविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांत गंभीर गुन्हे दाखल असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्याला राजकीय पाठबळ मिळत असल्यामुळे त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई होत नसल्याचा आरोप करत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून मुख्य सूत्रधारासह संबंधित व्यक्तींना आरोपी करण्यात यावे व त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी कुणबी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.
Rajya Sabha Election : एकनाथ शिंदेंनी साधला ‘सोशल बॅलन्स’, दलित चेहऱ्याला संधी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख राहुल कराडे यांच्या वरील हल्ल्याला राजकीय किनार असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजप यामध्ये वरून आमने-सामने उभे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपकडून या हल्ल्याबाबत केवळ राजकीय हेतूने आरोप केले जात असल्याचे यापूर्वी स्पष्ट केले आहे.








