government-to-form-metropolitan-company-for-city-bus-services : प्रशासन आणि कंपनीत संघर्षाची शक्यता; गणेशपेठच्या दुरवस्थेवर नाराजी
Nagpur नागपूर शहरात महानगरपालिकाने प्रवाशांना बससेवा उपलब्ध करून दिली आहे. या बससेवेचे संचलन करण्यासाठी महापालिकेची एक विशेष परिवहन समिती आहे. आता नागपूर शहर मेट्रोपोलिटन झाले आहे. शेजारची गावे आणि तालुके शहरासोबत जोडले गेले आहे. त्यामुळे महापालिकेच्या बसला आता शहराची सीमा ओलांडावी लागत आहे.
यासाठी राज्य शासनाने नागपूर मेट्रोपोलिटन परिवहन कंपनीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. एप्रिल महिन्यात या कंपनीचा आराखडा सादर केला जाणार आहे. त्यानंतर महापालिका आणि मेट्रोपॉलेटिन परिवहन कंपनी यांचे क्षेत्र व अधिकार निश्चित होणार आहे. मात्र यामुळे दोन्ही कंपनीती संघर्ष निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नागपूर जिल्ह्यातील सार्वजनिक बससेवेबाबात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची बैठक झाली. त्यात मेट्रोपोलिटन कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. महसूलमंत्री बावनकुळे यांनी नागपूरच्या गणेशपेठ बसस्थानकातील दुरवस्थेवर नाराजी व्यक्त केली. त्यांनी तातडीने २०० नवीन स्टीलच्या खुर्च्या, ५ वॉटर कुलर आणि प्रवाशांच्या निवासासाठी ५० बेडची अद्यावत डॉर्मिटरी बांधण्याच्या सूचना दिल्या.
Sukhoi Su 30 crash in assam : सुखोई विमान कोसळले, नागपूरच्या वैमानिकाने गमावले प्राण
तसेच, येथील ‘हिरकणी कक्ष’ केवळ नावाला न ठेवता तो पूर्ण सोयींनिशी सज्ज असावा, असे निर्देशही दिले. जिल्ह्यात सध्या १६० नवीन बसेसची आवश्यकता असून, त्यापैकी १०० बसेस (काटोल, गणेशपेठ, सावनेर, इमामवाडा, वर्धमाननगर) आधीच उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. रिक्त असलेल्या १५४ चालक-वाहकांच्या जागा दोन महिन्यांत भरण्याचे आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.
Maharashtra State Budget 2026 : फडणवीस ठरतील अर्थसंकल्प मांडणारे पहिले मुख्यमंत्री
काटोल बसस्थानकाचे नूतनीकरण आणि कोंढाळी येथील काम पूर्ण झाले आहे. हिंगणा, रामटेक आणि उमरेड येथील बसस्थानकांचे काम सुरू आहे. बुटीबोरी, कुही, जलालखेडा आणि खापा येथील बसस्थानके सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून (PPP) विकसित केली जाणार आहेत. कामठी आणि महुदा येथील कामांना पहिल्या टप्प्यात प्राधान्य देऊन मोहदा येथे मोठे बसस्थानक उभारण्यासाठी सरकारी जागेची मागणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.








