Water crisis : खामगाव पालिकेत एमआयएमचे ‘पुंगी बजाओ’; पाणी-स्वच्छतेच्या प्रश्नावर संताप

AMIM-protest-on-water-crisis-in-khamgao-municipal-council : रमजानमध्ये पाणीटंचाईचा फटका; फाटकपुरा-दाळफैल भागातील समस्या तातडीने सोडवण्याची मागणी

Khamgao शहरातील प्रभाग क्रमांक १२ तसेच फाटकपुरा-दाळफैल परिसरातील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत एमआयएम पक्षाच्या वतीने खामगाव नगरपरिषदेत शुक्रवारी ‘पुंगी बजाओ’ आंदोलन करण्यात आले. पाणीपुरवठा, स्वच्छता आणि वाढीव मालमत्ता कराच्या प्रश्नांवर तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलनकर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

निवेदनात नमूद करण्यात आले की, फाटकपुरा व दाळफैल परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून अर्ध्या वस्तीला नियमित पाणीपुरवठा होत असला, तरी उर्वरित भागात पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत आहे. सध्या पवित्र रमजान महिना सुरू असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

Harshwardhan sapkal : मोदी–सावरकरांचा एआय फोटो व्हायरल

याशिवाय फाटकपुरा परिसरात सफाई कामगारांची कमतरता असून पंधरा-पंधरा दिवस नाल्यांची साफसफाई होत नसल्याने अस्वच्छतेचे प्रमाण वाढत आहे, अशी तक्रारही करण्यात आली.

तसेच मस्तान चौकातील मशिदीजवळील नाल्यातून तीव्र दुर्गंधी पसरत असून नमाजासाठी येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे, त्यामुळे मशिदीच्या परिसरातील नाल्यांची तातडीने साफसफाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.

Anil Deshmukh : नागपूरला स्फोटांची राजधानी करायची आहे का? अनिल देशमुखांचा सरकारला सवाल

दरम्यान, शहरातील स्थावर मालमत्तांवर लावण्यात आलेला वाढीव कर रद्द करावा, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली.

या आंदोलनात मो. आरीफ, शेख नजर शेख दाऊद, शेख सलाम, अब्दुल अजीज, शेख रिजवान, मोहम्मद आयुब, शेख फरीद आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. एमआयएमच्या या आंदोलनामुळे नगरपरिषद प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, नागरिकांच्या मूलभूत समस्यांवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी जोर धरू लागली आहे.