Big-blow-to-congress-in-chikhli-many-joins-BJP : मुंबईत झाला पक्षप्रवेश सोहळा; माजी नगराध्यक्षांच्या पतीचाही समावेश
Chikhli चिखली मतदारसंघात काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला असून पक्षातील अनेक नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबई येथे झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत या सर्वांनी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला.
मुंबई येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात बाजार समितीचे माजी सभापती तसेच माजी नगराध्यक्षांचे पती किशोर सवडतकर, खरेदी-विक्री संघ व जिनिंग-प्रेसिंगचे संचालक तसेच माजी पंचायत समिती सभापती अरविंद देशमुख, गुलाबराव सपकाळ, काँग्रेसचे शहराध्यक्ष राहुल सवडतकर, माजी पंचायत समिती सभापती दयानंद राठोड, माजी सरपंच दिलीप वाडे, प्रा. विजय घुंगाळ, सरपंच अरुण सरनाईक, जगन्नाथ भोरे, सरपंच अनिल फेपाळे, शिवाजी पाटील, सतीश वाघमारे, गणेश फेपाळे, राहुल काकफळे, सिद्धार्थ मगर, भागवत वारे, ज्ञानेश्वर रामेकर, शेणफड नेमणार, मोहित काकडे, नितीन घेवंदे, सागर राठोड, मदन अंभोरे, अमोल सरनाईक, गजानन ठेंग, गजानन चव्हाण आणि नितीन अंभोरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश होता.
Teachers constituency : या शिक्षक मतदारसंघावर शरद पवार गटाचा दावा!
या वेळी बोलताना नव्याने भाजपमध्ये दाखल झालेल्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण भाजपमध्ये प्रवेश करत आहोत, असे सांगितले.
या प्रसंगी नगराध्यक्ष पंडितराव देशमुख, शहराध्यक्ष सागर पुरोहित यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, गेल्या एक ते दीड वर्षांपासून चिखली मतदारसंघात काँग्रेसमधून कार्यकर्ते बाहेर पडत असल्याचे चित्र दिसत असून, भाजपकडे झुकणारा राजकीय कल स्पष्ट होत असल्याची चर्चा सुरू आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा गृहजिल्हा आणि जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या मतदारसंघात काँग्रेसला लागलेली ही गळती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. सवडतकरांसारखे काँग्रेसचे जुने समर्थक भाजपमध्ये दाखल झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Pawar wealth : आजोबांपेक्षा नातू श्रीमंत! राज्यसभा प्रतिज्ञापत्रात उघड झाली पार्थ पवारांची संपत्ती
विशेष म्हणजे, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका अद्याप लांबल्या असताना आणि कोणतीही मोठी निवडणूक समोर नसतानाही चिखलीत पक्षांतराचे वारे वाहू लागल्याने या घडामोडींमागील राजकीय समीकरणांबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.








