Nana-patole-vijay-wadettivar-protest-against-lpg-price-hike : सिलींडर घेऊन काँग्रेस नेते पोहोचले विधीमंडळ परिसरात
Mumbai मुंबईत वाढलेल्या एलपीजी गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने तीव्र आंदोलन छेडले असून केंद्र सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे. काँग्रेस नेते नाना पाटोले आणि विजय वडेट्टीवार यांनी प्रतिकात्मक सिलींडर हातात घेऊन विधीमंडळ परिसरात प्रवेश केला. या आंदोलनादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर निशाणा साधत गॅस टंचाईसाठी केंद्र सरकारला जबाबदार धरले.
मुंबईत झालेल्या या आंदोलनात काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. शहरात गॅस सिलिंडरचा तुटवडा वाढत असून त्याचा परिणाम हॉटेल, रेस्टॉरंट तसेच स्ट्रीट फूड व्यवसायावर होत असल्याचे पटोले यांनी सांगितले. त्यांच्या मते, गॅस उपलब्ध नसल्यामुळे अनेक लहान-मोठ्या हॉटेल्सना स्वयंपाकघर बंद ठेवावे लागत आहे. काही ठिकाणी तर ७० ते ८० टक्के हॉटेल्सवर व्यवसाय बंद होण्याची वेळ आल्याचा दावा त्यांनी केला.
Sudhir mungantiwar : चंद्रपूर रिंग रोडसाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेत ठोस मागणी
या आंदोलनादरम्यान पटोले यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणाचाही उल्लेख केला. त्यांनी म्हटले की मध्यपूर्वेतील तणाव आणि अमेरिका-इस्रायल यांच्या धोरणांमुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होत आहे. मात्र भारत सरकारने यावर ठोस भूमिका घेतली नाही, असा आरोप त्यांनी केला. केंद्र सरकार अमेरिके-इस्रायलच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप करत त्यांनी सरकारच्या परराष्ट्र धोरणावरही टीका केली.
गेल्या काही दिवसांत एलपीजी गॅसच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्यामुळे देशातील अनेक शहरांमध्ये टंचाई निर्माण झाली आहे. मुंबईसह अनेक महानगरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळण्यात विलंब होत असून हॉटेल उद्योग आणि खाद्य व्यवसायाला मोठा फटका बसत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
काँग्रेसच्या आंदोलनात कार्यकर्त्यांनी गॅस दरवाढ आणि टंचाईविरोधात घोषणाबाजी करत केंद्र सरकारच्या धोरणांवर निषेध व्यक्त केला. सामान्य नागरिकांना स्वयंपाकासाठी गॅस मिळणे कठीण झाले आहे, तर छोट्या व्यावसायिकांचे उत्पन्न घटत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली.
ladki-bahin-yojana : लाडकी बहीण योजनेच्या बजेटमध्ये ९५०० कोटींची घट
पटोले यांनी सांगितले की, गॅस टंचाईचा परिणाम केवळ शहरांपुरता मर्यादित नाही. उद्योग, हॉटेल व्यवसाय तसेच लहान खाद्य व्यवसाय करणाऱ्या हजारो लोकांच्या रोजगारावर याचा परिणाम होत आहे. सरकारने तातडीने हस्तक्षेप करून गॅसचा पुरवठा सुरळीत करावा आणि दर नियंत्रणात ठेवावेत, अशी मागणी त्यांनी केली








