LPG crisis : अजून किती अच्छे दिन दाखवणार? विरोधकांचा सवाल

opposition-slams-government-over-the-decision-on-additional-kerosene-quota : केरोसीनच्या अतिरिक्त कोट्याच्या निर्णयावरून सरकारवर टीका

Buldhana मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाचा परिणाम आता थेट सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरात जाणवू लागला आहे. देशातील काही भागांत एलपीजी गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे नागरिकांना रांगा लावाव्या लागत असतानाच, केंद्र सरकारच्या तेल मंत्रालयाने राज्यांना ४० हजार किलोलीटर अतिरिक्त केरोसीन (घासलेट) उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात नवा वाद उफाळून आला असून, विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे.

केंद्र सरकारकडून सातत्याने देश धूरमुक्त झाल्याचा आणि एलपीजी गॅसमुळे स्वयंपाकघरे आधुनिक झाल्याचा दावा केला जातो. मात्र, आता अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त केरोसीन पुरवठ्याची गरज का भासली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एलपीजीच्या वाढत्या किमती आणि आता निर्माण झालेली संभाव्य टंचाई यामुळे सामान्य नागरिक पुन्हा जुन्या स्टोव्हच्या युगाकडे तर वळणार नाहीत ना, अशी भीती व्यक्त होत आहे.

Maha DBT : महाडीबीटीचा फुगा फुटला! पूर्वसंमती बंद, शेतकऱ्यांची थट्टा

या परिस्थितीवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारवर हल्लाबोल केला आहे. “भारतीयांना अजून किती ‘अच्छे दिन’ दाखवणार?” असा उपरोधिक सवाल करत त्यांनी गॅस टंचाईवरून केंद्र सरकारला घेरले आहे. सोशल मीडियावरही ‘अच्छे दिन की स्टोव्हचे दिन?’ अशा आशयाचे प्रश्न विचारले जात असून, जुन्या काळातील केरोसीनच्या रांगांची आठवण करून दिली जात आहे.

Donald trump : “मोजतबा खामेनी जिवंत नसल्याचं ऐकलंय”; डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा

एकीकडे गॅस सिलिंडरच्या अनुदानातील कपात आणि वाढते दर यामुळे जनता त्रस्त असताना, केरोसीनच्या अतिरिक्त कोट्याचा निर्णय सामान्यांमध्ये संभ्रम निर्माण करणारा ठरत आहे. परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला, तरी प्रत्यक्षात बाजारपेठेतील गॅस टंचाईच्या चर्चेने गृहिणींमध्ये अस्वस्थता पसरली आहे. आगामी काळात हा मुद्दा राजकीयदृष्ट्या अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत.