Zp election : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत नवा राजकीय ट्विस्ट, ठाकरे गट तटस्थ !

chhatrapati-sambhajinagar-zilla-parishad-election-thackeray-neutral-bjp-benefit-2026 : शिंदे गटाला धक्का, भाजपला अप्रत्यक्ष फायदा

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा राजकीय ट्विस्ट समोर आला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने या निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला असून कोणत्याही उमेदवाराला मतदान करू नये, असा व्हीप जारी करण्यात आला आहे. या निर्णयामुळे भारतीय जनता पक्ष ला अप्रत्यक्ष फायदा होण्याची शक्यता निर्माण झाली असून शिवसेना एकनाथ शिंदे गटाला याचा मोठा फटका बसणार असल्याची चर्चा रंगली आहे.

राज्यातील महाराष्ट्र मध्ये आज सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, सांगली आणि सातारा या पाच जिल्हा परिषदांमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांसाठी निवडणुका होत आहेत. त्यात संभाजीनगरमधील राजकीय समीकरणांमुळे ही निवडणूक विशेष चर्चेत आली आहे.

Nashik Crime: ‘स्वघोषित कॅप्टन’ अशोक खरात अटकेत, ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त

ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी काढलेल्या व्हीपनुसार १८ मार्च २०२६ रोजी होणाऱ्या निवडणुकीत पक्षाच्या कोणत्याही सदस्याने कोणालाही मतदान करू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. या भूमिकेमुळे निवडणुकीतील आकडेवारी पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, निवडणुकीआधी ठाकरे गटाचे दोन सदस्य गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. संजय निकम आणि ललिता सोनवणे हे सदस्य भाजपच्या गोटात गेल्याची चर्चा असून यामुळे सत्तासमीकरण अधिकच गुंतागुंतीचे झाले आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत एकूण ६३ सदस्य असून अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडण्यासाठी ३२ सदस्यांचे बहुमत आवश्यक आहे. सध्याच्या स्थितीनुसार भाजपकडे २३, शिंदे गटाकडे २१, ठाकरे गटाकडे ९, राष्ट्रवादी अजित पवार गटाकड ४, काँग्रेसकडे १ (जो भाजपमध्ये गेला आहे), राष्ट्रवादी (शरद पवार गट) कडे १ आणि अपक्ष ४ सदस्य आहेत.

या पार्श्वभूमीवर भाजपला आवश्यक संख्याबळ गाठण्याची संधी निर्माण झाली आहे. भाजपचे २३ सदस्य, अजित पवार गटाचे ४, काँग्रेसमधून गेलेला १ सदस्य, काही अपक्ष आणि ठाकरे गटातील फुटलेल्या सदस्यांचा पाठिंबा मिळाल्यास भाजपची ‘मॅजिक फिगर’ ओलांडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Mehkar municipal council : नगर परिषदेवर न्यायालय अवमानाचा ठपका; ‘स्टेटसको’ आदेश धाब्यावर बसविल्याचा आरोप

या सर्व घडामोडींमुळे संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणूक अत्यंत रंगतदार आणि अनिश्चिततेने भरलेली झाली असून अंतिम निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.