fake voters : धाडमध्ये ‘बोगस मतदार’ प्रकरणाने खळबळ; भाजप-प्रहारचा बहिष्काराचा इशारा

hundreds-of-outsiders-included-in-the-voters’-list-using-forged-documents : बनावट कागदपत्रांच्या आधारे शेकडो परप्रांतीयांची नावे मतदार यादीत

Dhad स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडवणारे ‘बोगस मतदार’ प्रकरण धाडमध्ये समोर आले असून, या मुद्द्याने आता थेट निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे शेकडो परप्रांतीयांची नावे मतदार यादीत समाविष्ट केल्याचा गंभीर आरोप भारतीय जनता पक्ष आणि प्रहार जनशक्ती पक्षाने केला आहे.

धाडमध्ये सुमारे दीड हजारांपर्यंत बोगस मतदार असल्याचा दावा करण्यात येत असून, यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर ‘जोपर्यंत मतदार यादी शुद्ध केली जात नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत,’ अशी ठाम भूमिका घेत भाजप आणि प्रहारने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.

bogus disabled beneficiaries : १२ शिक्षक, २ ग्रामसेवकांसह १५ जण निलंबित!

या प्रकरणी पक्षांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांची भेट घेत निवेदनासह पुरावे सादर केले. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, या प्रकाराचे धागेदोरे थेट आसाम राज्यापर्यंत जोडले गेले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. बनावट रहिवासी दाखले, भाडेकरार आणि आधार कार्डातील फेरफार करून परप्रांतीयांना ‘स्थानिक मतदार’ बनविण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, हा प्रकार केवळ प्रशासकीय त्रुटी नसून ‘व्होट बँक’ निर्माण करण्याचा प्रयत्न असू शकतो. मोठ्या प्रमाणावर मतदार यादीत फेरफार झाल्यास स्थानिक जनतेच्या मतदानाच्या हक्कावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.

Maharashtra assembly : विदर्भात नवीन विद्यापीठाचा मुद्दा ऐरणीवर; बुलढाण्यात स्वतंत्र विद्यापीठाची मागणी

दरम्यान, आगामी ग्रामपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर या प्रकरणाचे सावट गडद झाले आहे. नागरिकांनीही ‘आधी मतदार यादी दुरुस्त करा, मगच मतदान घ्या’ अशी ठाम मागणी करत प्रशासनाला इशारा दिला आहे. एकूणच, धाडमधील ‘बोगस मतदार’ प्रकरणाने स्थानिक राजकारण तापवले असून, प्रशासन या आरोपांवर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.