Sanjay gaikwad : आरोग्य भरतीत कंत्राटी घोटाळा? आमदार गायकवाड यांचा दावा

irregalarities-in-health-department-recruitment-sanjay-gaikwad : स्थानिकांना डावलून बाहेरच्यांना संधी? सभागृहात उपस्थित झाला प्रश्न

Buldhana राज्यातील आरोग्य विभागातील कंत्राटी भरती प्रक्रियेत मोठा गोंधळ आणि कथित गैरप्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप करत आमदार संजय गायकवाड यांनी विधानसभेत सरकारवर थेट हल्लाबोल केला. केंद्रीकृत भरतीच्या नावाखाली स्थानिक पात्र उमेदवारांना जाणीवपूर्वक डावलले जात असल्याचा मुद्दा त्यांनी आक्रमकपणे उपस्थित केला.
गायकवाड यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, सिटी स्कॅन, एमआरआय, डायलिसिससारख्या अत्यावश्यक आरोग्य सेवांसाठी डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ व इतर कर्मचाऱ्यांची भरती काही मोजक्या खासगी कंपन्यांच्या हाती सोपवली गेली आहे. या प्रक्रियेत जिल्हास्तरावरील संस्था आणि स्थानिक तरुणांना संधी मिळत नसून, संपूर्ण नियंत्रण राज्यस्तरावर केंद्रीत ठेवून ‘मनमानी’ सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

याच पार्श्वभूमीवर संबंधित कंपन्यांच्या कार्यपद्धतीची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची ठाम मागणी त्यांनी केली. “भरती प्रक्रिया जिल्हास्तरावर विकेंद्रित करा आणि स्थानिकांना प्राधान्य द्या,” असा थेट इशारा देत त्यांनी सरकारला धारेवर धरले.

Sudhir mungatiwar : मुनगंटीवारांनी दिला शब्द केला पूर्ण; बल्लारपूर गुरुद्वारात ज्येष्ठांसाठी लिफ्ट लोकार्पण

इतकेच नव्हे, तर या कंत्राटी व्यवस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचेही शोषण होत असल्याचा गंभीर मुद्दा त्यांनी मांडला. अपुरे वेतन, भविष्यनिर्वाह निधी व विमा यांसारख्या मूलभूत हक्कांपासून कर्मचाऱ्यांना वंचित ठेवले जात असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक ठिकाणी महिनोनमहिने पगार रखडतो, तर कोणतीही पूर्वसूचना न देता कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचे प्रकार घडत असल्याचा आरोप त्यांनी केला.

Property tax hike : मालमत्ता करवाढीवर खामगावात राजकीय तापमान वाढले; निर्णय पुन्हा लांबणीवर!

आरोग्य व्यवस्थेतील पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या मुद्द्यामुळे राज्याच्या कारभारावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, सरकार यावर नेमकी काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.