Vijay Wadettiwar : खरात फाईलने अनेक बड्या मंत्र्यांची खुर्ची धोक्यात!

Vijay Wadettiwar claims the Ashok Kharat case could put several senior ministers’ positions at risk : विजय वडेट्टीवार यांचा दावा, व्यवहार उघड करण्याची मागणी

Nagpur भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण आता केवळ अंधश्रद्धेपुरते मर्यादित राहिले नसून, त्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली आहे. खरातच्या संपर्कात असलेले अनेक मंत्री आणि बड्या नेत्यांचे धाबे दणाणले असून, हे प्रकरण दाबादाबी करण्याचा प्रयत्न सरकारकडून होत असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. अशोक खरातसोबत ज्या मंत्र्यांचे फोटो आहेत, त्या सर्वांची सखोल चौकशी करण्यात यावी. केवळ फोटोच नाही, तर त्यांचे कॉल डिटेल्स (CDR) तपासून कोणी किती व्यवहार केले, याची माहिती उघड करण्याची मागणीही त्यांनी केली.

हे प्रकरण अमेरिकेतील कुप्रसिद्ध ‘एपस्टाईन फाईल्स’सारखेच असल्याचे म्हटले जात आहे. खरातकडे सुमारे ५६ आक्षेपार्ह व्हिडिओ असून, त्यामध्ये अनेक बड्या हस्तींचे चेहरे उघड होण्याची शक्यता आहे. गुंगीचे औषध आणि व्हायग्राचा वापर करून भोंदूगिरीच्या नावाखाली नेमके काय काळेबेरे चालले होते, याचा तपास करण्यात यावा. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर या अशा भोंदू बाबांच्या आहारी गेल्या असतील, तर त्या महिलांना काय न्याय देणार? असा सवाल त्यांना राजीनामा द्यावाच लागला असता असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.

Amravati revenue department : ७० वर्षांपूर्वीच्या ‘दाना’वरून गावात दोन गट आमनेसामने!

त्यांनी जरी वैयक्तिक करणासाठी राजीनामा दिला असल्याचे म्हटले असले तरी जगाला सर्व ठावूक आहे. महिलांवर बलात्कार करणाऱ्या भोंदू बाबांचे पाय धुणाऱ्या आणि त्यांच्या डोक्यावर छत्री धरणाऱ्या चाकणकर यांना महिला आयोगाचे अध्यक्षपदी राहण्याचा अधिकारच नाही.

ज्याने हे प्रकरण उघडकीस आणले, त्यालाच अटक करून मूळ सूत्रधारांना वाचवण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोप होत आहे. पोलिसांवर प्रचंड राजकीय दबाव असून, मोठ्या माशांना’ वाचवण्यासाठी पुरावे नष्ट केले जात असल्याची भीती वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. या प्रकरणावरून आगामी विधानसभा अधिवेशनात मोठे रणकंदन होण्याची चिन्हे आहेत.आम्ही अधिवेशनात खराताची वरात काढू आणि कोणकोणते मंत्री यात सामील आहेत, त्यांची नावे पुराव्यासह मांडू,असा इशाराही त्यांनी दिला.

Akola district bank : अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत वाद

धर्माच्या नावाखाली अधर्म करणाऱ्यांना सरकारचा ‘राजाश्रय’ कसा मिळत आहे, याचा जाब आता विचारला जाणार आहे. महाराष्ट्राच्या संत परंपरेला काळिमा फासणारे हे कृत्य आहे. पदाचा मान न राखता भोंदू बाबाच्या पाया पडणाऱ्या आणि अधर्माला साथ देणाऱ्या मंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अन्यथा जनता त्यांना माफ करणार नाही असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.