Ravi Rana : अमरावती पोलिसांबद्दल काही आमदारांची नाराजी, रवी राणांकडून मात्र कौतुक

ravi rana praises amravati police, while other mlas complaining about performance : विधानसभेत अमरावती पोलिसांच्या कामगिरीचा गौरव; कौतुकाला चढला राजकीय रंग

Amravati शहरात ‘एमडी’ ड्रग्ज प्रकरणावरून सुरू असलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर, आमदार रवी राणा यांनी विधानसभेत अमरावती पोलिसांच्या कामगिरीचे जाहीर कौतुक केले. एकीकडे काही आमदारांनी अमरावती पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पोलिस दलावर टीका केली आहे. मात्र, रवी राणा यांनी उलट भूमिका घेतल्यामुळे त्याला राजकीय रंग चढला आहे.

राणा यांनी विशेषतः पोलिस आयुक्त राकेश ओला, गुन्हे शाखा प्रमुख संदीप चव्हाण आणि त्यांच्या टीमचे नाव घेऊन कौतुक केले. ड्रग्जविरोधात राबवलेल्या कारवाईत पोलिसांनी ज्या पद्धतीने जाळे उध्वस्त केले, त्याचे त्यांनी विधानसभेत अभिनंदन केले.

गेल्या अडीच महिन्यांत अमरावती गुन्हे शाखेने सुमारे ३.५८ कोटी रुपये किंमतीचे २.३५२ किलोहून अधिक एमडी ड्रग्ज जप्त केले असून, मुंबईतील चार प्रमुख तस्करांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास राजस्थानपर्यंत पोहोचवत पोलिसांनी आंतरराज्य टोळ्यांचा पर्दाफाश केला आहे.

Andhare vs mhatre : “तुमचा ओरिजिनल व्हिडिओ सापडला का?” सुषमा अंधारेंचा शितल म्हात्रेंना सवाल

दरम्यान, अमरावती शहर ‘एमडी’ ड्रग्जचे आंतरराष्ट्रीय केंद्र बनत असल्याची टीका विधिमंडळात करण्यात आली होती. मात्र, पोलिसांच्या तपासातून या गुन्ह्याचे धागेदोरे मुंबई आणि राजस्थानपुरते मर्यादित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

India lpg petrol diesel : देशात एलपीजी, पेट्रोल-डिझेल टंचाईची भीती निराधार!

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावती पोलिस ड्रग्जमुक्त शहरासाठी सातत्याने प्रयत्न करत असल्याचे सांगत राणा यांनी पोलिस दलाचा गौरव केला. दरम्यान, आमदारांमध्ये पोलिसांच्या भूमिकेवरून मतभेद असताना रवी राणा यांनी केलेले हे कौतुक सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, यामुळे अमरावती पोलिस दलाचे मनोबल उंचावल्याचे मानले जात आहे.