Israel iran us tension : पाकिस्तानकडून इस्त्रायलला थेट इशारा; जागतिक पातळीवर खळबळ !

pakistan-warning-israel-iran-us-tension-global-reaction-marathi-news : इराण-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर भडक वक्तव्याने वादाचा भडका

New Delhi :  इराण आणि अमेरिका यांच्यात वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने इस्त्रायलला दिलेल्या इशाऱ्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे. मध्यपूर्वेत सुरू असलेल्या घडामोडींमध्ये थेट सहभाग नसतानाही पाकिस्तानकडून सातत्याने आक्रमक भूमिका घेतली जात असल्याचे चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या वक्तव्यामुळे परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तेहरानमधील पाकिस्तानी दूतावास परिसराच्या सुरक्षेबाबत पाकिस्तानने इस्त्रायलला कडक इशारा दिला आहे. इस्रायलने कोणतीही कारवाई करताना पाकिस्तानच्या राजनैतिक अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करावा, अन्यथा कठोर प्रत्युत्तर दिले जाईल, असे पाकिस्तानकडून स्पष्ट करण्यात आले आहे. “आम्ही कतार नाही, आमच्यावर कोणतीही कारवाई सहन केली जाणार नाही,” अशा शब्दांत हा इशारा देण्यात आल्याचे समजते.

Sushant dalvi : कणकवलीत बांधकाम व्यावसायिक सुशांत दळवी यांचा संशयास्पद मृत्यू

तेहरानमध्ये झालेल्या स्फोटांनंतर ही प्रतिक्रिया समोर आली आहे. प्राथमिक अहवालानुसार, या घटनेत पाकिस्तानी दूतावास किंवा तेथील कर्मचाऱ्यांचे कोणतेही नुकसान झाले नसले तरी परिसरात झालेल्या स्फोटांमुळे काही इमारतींना धक्का बसल्याची माहिती आहे. या घटनेनंतर पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून सुरक्षेच्या दृष्टीने सतर्कता वाढवण्यात आली आहे.

या सर्व घडामोडींमध्ये पाकिस्तानने अमेरिकेविरुद्ध थेट भूमिका न घेता इस्त्रायलवर निशाणा साधल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या भूमिकेबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काही तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तानकडून दिले जाणारे असे इशारे परिस्थिती आणखी बिघडवू शकतात.

दरम्यान, भारताने या संपूर्ण तणावात संतुलित भूमिका घेत शांततेचे आवाहन केले आहे. युद्ध थांबवण्यासाठी आणि संवादातून मार्ग काढण्यासाठी भारत आग्रही असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, एकीकडे शांततेचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे भडक वक्तव्यांमुळे तणाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Ashok kharat case : अशोक खरात प्रकरणाला नवे वळण; एसआयटी तपासात धक्कादायक बाबी उघड

सध्या या प्रकरणाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले असून पुढील काही दिवसांत परिस्थिती कोणत्या दिशेने वळते, हे महत्त्वाचे ठरणार आहे. इस्त्रायल या इशाऱ्याला कसा प्रतिसाद देतो आणि आंतरराष्ट्रीय समुदाय यावर काय भूमिका घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.