LPG crisis : सिलींडरसाठी नव्हे, फक्त चौकशीसाठी लागताहेत रांगा

cylinder customer panic for just enquiry, agencies new rule creating unrest : गॅस एजन्सीजचे नवे फर्मान ठरतेय डोकेदुखी, ग्राहकांचे हाल

Nagpur सध्या गॅस सिलिंडर हा सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. सिलिंडर मिळणार की नाही, याची चिंता अनेकांना सतावत आहे. मागील आठवड्यात मोठी टंचाई निर्माण झाल्याने सिलिंडरसाठी ग्राहकांनी अर्ध्या किलोमीटरच्या रांगा लावल्या होत्या. त्या टाळण्यासाठी प्रशासनाने ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक केले होते. त्याशिवाय सिलिंडर मिळणार नाही आणि ३० दिवसांच्या अंतरानेच सिलिंडर मिळेल, असा आदेश काढण्यात आला.

सोबतच जिल्हाधिकाऱ्यांनी गॅस एजन्सींना घरपोच सिलिंडर देण्याचे निर्देश देऊन रांगा लावू नयेत, असे आवाहन केले होते. आता एजन्सीसमोर सिलिंडर घेऊन ग्राहकांच्या रांगा दिसत नाहीत, मात्र यावरून संकट टळले आहे असे म्हणता येणार नाही. कारण, आता आपला सिलिंडर आला की नाही, याची माहिती जाणून घेण्यासाठीही ग्राहकांना रांगेत उभे राहण्याचे फर्मान सोडले आहे. त्यामुळे आता पुन्हा ग्राहकांना केवळ विचारणा करण्यासाठी दोन-दोन तास उन्हात उभे राहावे लागत आहे.

Crime News: प्रियकराच्या संशयातून संतप्त प्रेयसीने मैत्रिणींसह घरात घुसून तरुणीचे केस कापले !

अमेरिका आणि इराण युद्धामुळे मोठी संकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे. याची झळ आता सर्वसामान्य नागरिकांना बसू लागली आहे. आधी सिलिंडर टंचाई आणि आता पेट्रोल टंचाईने सर्वच जण हैराण झाले आहेत. आठवडाभर पेट्रोलसाठी वाहनचालकांनी आपापल्या गाड्यांच्या रांगा लावल्या होत्या. पेट्रोल मिळणार नाही, या भीतीने अनेकांनी गाड्यांच्या टाक्या ‘फुल्ल’ केल्या. त्यामुळे अनेक पेट्रोल पंप बंद पडले आहेत. अद्यापही पेट्रोलचा पुरवठा सुरळीत झालेला नाही. टप्प्याटप्प्याने टँकर येत आहेत.

मात्र, बहुतांश लोकांनी गाड्यांच्या टाक्या पूर्ण भरल्याने पंपावरची गर्दी काहीशी निवळली आहे. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेट्रोल-डिझेलचा साठा पुरेसा आहे, कोणीही रांगा लावू नयेत आणि भीती पसरवू नये, असे आवाहन केले आहे. त्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे. सोबतच पेट्रोल पंप चालकांना रेशनिंग करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार, दुचाकी चालकांना एका वेळी दोन लिटर, तर कार चालकांना दोन हजार रुपयांपेक्षा अधिकचे पेट्रोल दिले जात नाही.

Bomb attack threat : पोस्ट व पासपोर्ट कार्यालयांवर बॉम्बहल्ल्याची धमकी; बुलढाण्यात पोलिसांची धावपळ

दुसरीकडे, गॅस सिलिंडर ग्राहक अद्यापही प्रतीक्षेतच आहेत. त्यांचे नंबर लावून घेतले जात आहेत, ओटीपी क्रमांकही दिले जात आहेत; मात्र सिलिंडर घरपोच दिले जात नाहीत. सिलिंडर घरी का आले नाही, याची विचारणा करण्यासाठी ग्राहकांना रांगेत येण्याच्या सूचना केल्या जात आहेत. आमच्या प्रतिनिधींशी एका सिलिंडर ग्राहकाने संपर्क साधून, केवळ चौकशी करण्यासाठी आपण तासभरापासून रांगेत उभे असल्याचे सांगितले. त्यांनी १० मार्च रोजी सिलिंडर बुक केले होते.

१९ तारखेला त्यांना ओटीपी पाठवण्यात आला. २६ मार्चपर्यंत त्यांनी प्रतीक्षा केली, मात्र सिलिंडर मिळाला नाही. शेवटी शुक्रवारी वर्धमाननगर, एच.बी. टाऊन परिसरातील ‘एचपी’ कंपनीच्या जयहिंद गॅस एजन्सीत ते विचारणा करण्यासाठी गेले असता, त्यांना रांगेत या असे सांगण्यात आले. त्यांच्यापूर्वी याच कामासाठी सुमारे २५ ग्राहक रांगेत उभे होते.