व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Amravati Municipal corporation : अमरावती मनपात व्यापारी संकुल भाडेवाढीवर गदारोळ; उत्पन्न वाढीसाठी...

Amravati Municipal corporation : अमरावती मनपात व्यापारी संकुल भाडेवाढीवर गदारोळ; उत्पन्न वाढीसाठी दरवाढीची मागणी

Demand for rate hike to boost revenue in Amravati Municipal Corporation : बजेटमध्ये व्यापारी संकुलांमधून वार्षिक ४.५ कोटी रुपयांचे भाडे अपेक्षित

Amravati महानगरपालिकेच्या विशेष आमसभेत व्यापारी संकुलांच्या गाळ्यांच्या भाडेवाढीच्या मुद्द्यावर तब्बल चार तास जोरदार चर्चा रंगली. मनपाच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी ४ बीओटी तत्त्वावरील तसेच २३ सर्वसाधारण व्यापारी संकुलांतील गाळ्यांचे भाडे वाढवण्याची गरज नगरसेवकांनी अधोरेखित केली.

बजेटमध्ये या संकुलांमधून वार्षिक केवळ ४.५ कोटी रुपयांचे भाडे अपेक्षित धरण्यात आल्याने विरोधी पक्षनेते विलास इंगोले यांनी आक्षेप नोंदवला. सभागृह नेते चेतन गावंडे व प्रशांत देशपांडे यांनीही भाडेवाढीचा प्रस्ताव गांभीर्याने घेण्याची मागणी केली. यावेळी सभापती श्रीचंद तेजवानी, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर आणि आयुक्त सौम्या शर्मा यांच्याकडे यासंदर्भात तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली.

नगरसेवकांनी बाजार व परवाना विभागाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत, भाडे दर निश्चित करण्यात जाणूनबुजून विलंब होत असल्याचा आरोप केला. बाजारभावानुसार दर ठरवून किमान १० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. मात्र काहींनी हा आकडा जास्त असल्याचे सांगत ७ कोटींचा पर्याय सुचवला.

Akola Police : तुझ्या मुलीला एका रात्रीसाठी माझ्याकडे पाठव, दहा हजार रुपये देतो

0

मनपाच्या मालकीची एकूण २७ व्यापारी संकुले असून, त्यापैकी ४ बीओटी तत्त्वावरील संकुलांचे करार संपले आहेत. सध्या अनेक ठिकाणी १ रुपया प्रति चौरस फुट दराने भाडे आकारले जात असल्याने तो अत्यंत कमी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. शहरातील विकासकामांसाठी स्वतःचे उत्पन्न वाढवणे अत्यावश्यक असल्याने भाडेवाढीचा निर्णय लवकर घेण्याचे संकेत सभेत देण्यात आले.

error: Content is protected !!