trump-warning-iran-hormuz-strait-nuclear-strike-threat-us-iran-conflict : होर्मूझ समुद्रधुनीवरून तणाव तीव्र
Washington : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला थेट इशारा देत परिस्थिती अधिक चिघळवली आहे. इराणने होर्मूझ समुद्रधुनी तेल वाहतुकीसाठी तातडीने खुली केली नाही, तर त्याच्या अणुकेंद्रांवर थेट लष्करी हल्ले करण्यात येतील, अशी स्पष्ट धमकी त्यांनी दिली.
भारतीय वेळेनुसार गुरुवारी सकाळी सुमारे साडेसहा वाजता केलेल्या सुमारे वीस मिनिटांच्या राष्ट्राला संबोधनात ट्रम्प यांनी सुरू असलेल्या युद्धस्थितीबाबत माहिती दिली. या संबोधनात त्यांनी अमेरिकेची भूमिका ठामपणे मांडत इराणवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला.
ट्रम्प म्हणाले की, होर्मूझ समुद्रधुनी अमेरिकेसाठी अत्यावश्यक नाही आणि ज्या देशांची अर्थव्यवस्था या मार्गावर अवलंबून आहे, त्यांनीच त्याचे संरक्षण करावे. मात्र, या मार्गावर अडथळे निर्माण झाल्यास जागतिक परिणाम होऊ शकतात, याचीही त्यांनी जाणीव करून दिली.
Hanuman jayanti : हनुमान जयंतीनिमित्त माकडांची शिस्तबद्ध पंगत, भक्ती आणि भूतदयाचा संगम
गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या संघर्षात अमेरिका आणि इस्रायलने इराणवर तीव्र हल्ले केले असून इराणकडूनही त्याला प्रत्युत्तर दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी आगामी काळात आणखी आक्रमक भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. पुढील दोन ते तीन आठवड्यांत इराणवर अधिक घातक हल्ले चढवले जातील आणि त्याच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांनाही लक्ष्य केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
अमेरिकन लष्कराच्या क्षमतेचे कौतुक करताना ट्रम्प यांनी व्हेनेझुएलामधील कारवाईचा उल्लेख करत आपल्या सैन्याच्या यशस्वी कामगिरीचा दाखला दिला. तसेच, ऊर्जा क्षेत्रात अमेरिका आता मध्य-पूर्वेवर अवलंबून नसल्याचा दावा करत त्यांनी देशाची ऊर्जा स्वयंपूर्णता अधोरेखित केली.
Road in bad condition : निकृष्ट रस्त्यांच्या ‘शांती’साठी नागरिकांकडून ‘होम-हवन’!
मात्र, असे असले तरी मित्रदेशांच्या सुरक्षेसाठी अमेरिका मध्य-पूर्वेत सक्रिय राहील, असेही त्यांनी सांगितले. ट्रम्प यांच्या या आक्रमक वक्तव्यामुळे आधीच तणावपूर्ण असलेल्या अमेरिका-इराण संबंधांमध्ये आणखी तीव्रता येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








