व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Chandrapur Municipal Corporation : चंद्रपूर महानगरपालिकेत नगरसेवकांचे बंडाचे रणशिंग! अंतर्गत कलहाचा अदृश्य...

Chandrapur Municipal Corporation : चंद्रपूर महानगरपालिकेत नगरसेवकांचे बंडाचे रणशिंग! अंतर्गत कलहाचा अदृश्य सूत्रधार कोण?


internal conflict in BJP, Corporators rebel against their own party’s Mayor : भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, पक्षाची ‘शिस्त’ मोडण्याची हिंमत कुणाच्या जोरावर?

Chandrapur भाजपा म्हणजे शिस्त, आदेशावर चालणारा आणि नेतृत्वाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करणारा पक्ष. आदेश मिळताच काम फत्ते करणारे कार्यकर्ते आणि पदाधिकारी ही या संघटनेची ओळख. असा सर्वसामान्य समज आहे. मात्र, याच शिस्तबद्ध पक्षात चंद्रपूर महानगरपालिकेत वेगळेच चित्र समोर आले असून, महापौरांविरुद्ध स्वतःच्याच पक्षातील नगरसेवकांनी उघड बंड पुकारले आहे.

पक्षशिस्त धाब्यावर बसवून थेट महापौरांना आव्हान देण्याचे धाडस या नगरसेवकांनी केले, ही बाब गंभीर मानली जात आहे. त्यामुळे या बंडामागे नेमके कोणाचे बळ आहे आणि कोणाचे ‘आशीर्वाद’ आहेत, हा आता चंद्रपूरच्या राजकारणातील कळीचा आणि चर्चेचा मुद्दा ठरत आहे.

Kerala Assembly elections : दटके, सोले, फुके, व्यास डाव्यांच्या बालेकिल्ल्यात; दक्षिण दिग्विजयासाठी भाजपचा ‘नागपूर पॅटर्न’!

चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपचा महापौर बसावा, एवढे संख्याबळ नव्हते. तरीही भाजपाने परिस्थिती नसतानाही महापौरांना निवडून आणण्याचे चातुर्य दाखवले. महापौर संगीता खांडेकर यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडली. राज्यात आदर्श ठरणारी कामगिरी चंद्रपूर भाजपाने करून दाखवली. आता त्याच महापौर संगीता खांडेकर यांच्याविरोधात भाजपाच्या नगरसेवकांनी बंड पुकारले आहे. यातून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, “हीच का तुमची शिस्त?” असा बोचरा सवाल आता पक्षाच्या ध्येयधोरणांवर उपस्थित केला जात आहे.

नगरसेवकांमध्ये इतकी ताकद कुठून आली, या बंडाच्या मागील ‘सुपारी मास्टर’ कोण आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. चंद्रपूर महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेत या वादाचा स्फोट झाला. सभागृहात नेतेपदासाठी जयश्री जुमडे यांचे नाव जाहीर होताच असंतुष्ट नगरसेवकांचा संयम सुटला आणि त्यांनी सभागृहातच जोरदार गोंधळ घातला. हा विरोध केवळ सभागृहापुरता मर्यादित राहिला नाही, तर संतप्त नगरसेवकांनी थेट महापौरांच्या दालनावर धडक देऊन आपला तीव्र निषेध नोंदवला.

Grenade attack at BJP chandigarh office : भाजपा कार्यालयाबाहेरील ग्रेनेड हल्ल्याचं पाकिस्तान कनेक्शन?

आपल्याच पक्षाच्या महापौरांविरुद्ध अशा प्रकारे आक्रमक पवित्रा घेतल्याने भाजपमधील अंतर्गत गटबाजी आता चव्हाट्यावर आली आहे. या सर्व प्रकारामुळे पक्षाच्या प्रतिमेला मोठा तडा गेला आहे. हा केवळ पदाचा वाद नसून एका मोठ्या राजकीय रणनीतीचा भाग असल्याचे मानले जात आहे.

या संपूर्ण सत्तानाट्यामागे बाहेरून पक्षात आलेल्या नेतृत्वाचा संदर्भ जोडला जात आहे. किशोर जोरगेवार यांच्या भाजप प्रवेशावेळी झालेला विरोध हा केवळ नावापुरता नव्हता, तर त्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. सत्तेसाठी पक्षात स्थान दिलेल्या काही घटकांमुळे मूळ संघटनात्मक रचनेत तणाव निर्माण झाला असून, त्यातूनच ही उघड बंडखोरी उफाळून आली असल्याची चर्चा राजकीय गोटात रंगली आहे. पक्षाची शिस्त मोडून महापौरांना थेट आव्हान देणाऱ्या या नगरसेवकांच्या पाठीमागे नेमकं कोणाचं बळ आणि कोणाचे ‘आशीर्वाद’ आहेत, हा आता कळीचा मुद्दा ठरला आहे.

Navneet Rana : ठाकरेंपुढे ‘हनुमान चालीसा’ पठणाशिवाय पर्याय नाही, नाहीतर शिल्लक सेनेवरही ‘गदा’!

विशेष म्हणजे महापालिकेच्या निवडणुकीत कधी नव्हे ती एबी फॉर्मची चोरी झाली होती. प्रदेशाध्यक्ष यांनी जाहीर केलेली उमेदवारांची यादी सुद्धा बदलली होती. या मुळे जोरगेवार समर्थक भाजपच्या शहर अध्यक्षाची तत्काळ हकालपट्टी करण्यात आली होती. याच घोळामुळे निवडणुकीत मोठा फटका बसला. या नंतरही पक्षाचे काही नेते सुधरायला तयार नाहीत. या कुरघोडीच्या राजकारणामुळे जनमानसात पक्षाची प्रतिमा मलिन होत असून, या वादाचा ‘अदृश्य सूत्रधार’ नेमका कोण आहे, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्ताधारी पक्षातच लागलेली ही ठिणगी आगामी काळात कोणते नवे वळण घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

error: Content is protected !!