rahul bondre clarifies, will not leave congress at any condition : शिवसेना आमदाराच्या भेटीनंतर राहुल बोंद्रेंची स्पष्टोक्ती
Buldhana वनमिशनचे प्रमुख तथा उध्दवसेनेचे नेते संदीप शेळके यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतल्यानंतर त्यांना जिल्हाध्यक्षपद मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे. तसा कामांचा धडाका शेळके यांनी सुरू केला आहे. या पक्ष प्रवेशानंतर काही प्रमाणात काँग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे हे बाजुला पडल्याचे चित्र आहे. अशातच ते काँग्रेस पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.मात्र, काँग्रेस आपल्या रक्तात असून पक्ष सोडणार नसल्याचे राहुल बोंद्रे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे, राहुल बोंद्रे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
जिल्ह्यात कॉग्रेस पक्षात गत काही दिवसांपासून इनकमींग सुरू आहे. मित्र पक्ष असलेल्या उद्रध्दव सेनेलाच काँग्रेसने दणका देत संदीप शेळके यांना गळाला लावले आहे. त्यातच शेळके यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे संकेत आहेत. शेळके पक्षात आल्यानंतर राहुल बोंद्रे काही प्रमाणात साईड ट्रॅक झाले आहेत. त्यामुळे, ते काँग्रेस पक्ष सोडणार, अशी चर्चा सुरू होती. त्यातच शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या अलीकडील भेटीनंतर बोंद्रे पक्षांतर करणार, अशा चर्चांना जोर आला होता. मात्र, स्वतः बोंद्रे यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया देत या सर्व अफवांना पूर्णविराम दिला.
Sanjay Gaikwad : संजय गायकवाड यांचा लोणारकडे मोर्चा, खासदारकीसाठी मोर्चेबांधणीची तयारी?
“गायकवाड यांची भेट ही केवळ औपचारिक होती. त्यामागे कोणतेही राजकीय समीकरण नाही,” असे स्पष्ट करत राहुल बोंद्रे म्हणाले, “माझ्या रक्तात काँग्रेस आहे आणि मी काँग्रेस कधीच सोडणार नाही.”
Voter verification drive : रिसोडमध्ये बीएलओवर हल्ला; मतदार पडताळणी कामात अडथळा, कर्मचाऱ्यांत संताप
गेल्या काही दिवसांपासून आमदार श्वेता महाले विरुद्ध आमदार संजय गायकवाड संघर्षाच्या पार्श्वभूमीवर बोंद्रे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. गायकवाड-बोंद्रे भेटीनंतर नव्या राजकीय समीकरणांच्या चर्चा रंगल्या; मात्र बोंद्रे यांनी कोणत्याही प्रकारच्या राजकीय तडजोडीला स्पष्ट नकार देत काँग्रेसप्रती आपली व्यक्त केली आहे.








