व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण rahul bondre : राहुल बोंद्रे यांच्या फलकावर चपला मारल्या, महिलांचा रोष

rahul bondre : राहुल बोंद्रे यांच्या फलकावर चपला मारल्या, महिलांचा रोष

BJP mahila aghadi protest against congress leader rahul bondre controversial statement : काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यावरून राजकारण तापले, भाजपा महिला आघाडी आक्रमक

Chikhli जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी महिलांच्या कुंकू आणि मंगळसूत्र संदर्भात केलेल्या वक्तव्याविरोधात चिखली येथे भाजपा महिला आघाडीने आक्रमक भूमिका घेत तीव्र निषेध नोंदविला. या प्रकरणामुळे शहरातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येत बोंद्रे यांच्या फलकावरील छायाचित्राला चपला मारून संताप व्यक्त केला.

दरम्यान, राहुल बोंद्रे हे अलीकडील विविध राजकीय घडामोडींमुळे चर्चेत आहेत. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी नुकतीच चिखलीतील रेणुका मातेच्या यात्रेदरम्यान बोंद्रे यांच्या निवासस्थानी भेट दिल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या होत्या. शिवसेना प्रवेशाबाबत सुरू असलेल्या चर्चांवर स्पष्टीकरण देताना बोंद्रे यांनी आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे पुन्हा स्पष्ट केले.

Malkapur municipal council : कुरघोडीच्या राजकारणात काँग्रेसचे संघटन विस्कळीत

तसेच, भाजपा कुटनीतीने आपली बदनामी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. याच पत्रकार परिषदेत आपल्या भूमिकेचे समर्थन करताना त्यांनी उदाहरणादाखल कुंकू आणि मंगळसूत्राचा उल्लेख केला होता. या वक्तव्याची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होताच भाजपा महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली. महिलांनी कपाळावर ठसठशीत कुंकू लावून निषेध नोंदवित बोंद्रे यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत विरोध केला.

water crisis : १४ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई, भरउन्हात नागरिकांची भटकंती

या आंदोलनात महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्षा नीता सोळंकी, तालुका सरचिटणीस उषाताई पवार, नगरसेविका विमलताई देव्हडे, महिला व बालकल्याण सभापती सुषमाताई चव्हाण उपस्थित होत्या. या निषेध आंदोलनामुळे चिखलीतील राजकीय वातावरण आणखी ढवळून निघाले आहे.

error: Content is protected !!