व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Iran war : अणुबॉम्ब वाहक ‘डूम्सडे प्लेन’च्या हालचालींमुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण...

Iran war : अणुबॉम्ब वाहक ‘डूम्सडे प्लेन’च्या हालचालींमुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण !

donald-trump-iran-war-doomsday-plane-us-israel-tension-global-alert : ट्रम्प यांच्या इराणवरील धमकीनंतर तणाव शिगेला

New Delhi : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर तणाव वाढताना दिसत असून, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कठोर इशाऱ्यानंतर परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. युद्धाचा ३९ वा दिवस सुरू असताना ट्रम्प यांनी इराणला पुन्हा इशारा देत, तर अमेरिका इराणला एका रात्रीत नष्ट करू शकते आणि ही कारवाई कधीही होऊ शकते, असे स्पष्टपणे सांगितले आहे.

या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या आण्विक युद्धासाठी वापरल्या जाणाऱ्या विशेष ‘डूम्सडे प्लेन’च्या हालचालींनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. बोईंग E-4B नाईट वॉच या विशेष विमानाने नेब्रास्का राज्यातील ओमाहा परिसरात घिरट्या घालत असल्याचे समोर आले आहे. अणू युद्धाच्या परिस्थितीत कमांड आणि कंट्रोल केंद्र म्हणून वापरल्या जाणाऱ्या या विमानाच्या हालचालींमुळे संभाव्य मोठ्या कारवाईबाबत तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.

bypoll 2026 : बारामती पोटनिवडणुकीवरून राष्ट्रवादी-काँग्रेस वाद पेटला;

दरम्यान, ट्रम्प यांनी अमेरिकन लष्कराच्या क्षमतेवर भर देत अल्पावधीत मोठे नुकसान करण्याची ताकद अमेरिकेकडे असल्याचे म्हटले आहे. हे युद्ध सध्या अमेरिकेच्या रणनीतीनुसार चालत असल्याचा दावा करत त्यांनी इराणला स्पष्ट संदेश दिला आहे. मात्र, या वक्तव्यांमुळे परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दुसरीकडे, इराणने ट्रम्प यांच्या धमक्यांना फारसे गांभीर्याने घेतले नसल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेच्या इशाऱ्यांना आमच्या देशातील लहान मुलेसुद्धा घाबरत नाहीत, अशा शब्दांत इराणकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. तसेच, संभाव्य कारवाईची प्रतिक्षा असल्याचे आव्हानात्मक विधानही करण्यात आले आहे, ज्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला आहे.

याचदरम्यान, अमेरिकन गुप्तचर यंत्रणांकडून इराणच्या नेतृत्वाबाबत एक मोठा दावा करण्यात आला आहे. मोजतबा खामेनी हे सध्या कोमात असल्याचा दावा अमेरिकेकडून करण्यात आला असून, ते देश चालवण्यास असमर्थ असल्याचेही सांगितले जात आहे. कोम शहरात त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, इराणकडून याबाबत अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.

Baramati bypoll : सुनेत्रा पवारांच्या अर्जावेळी पुरुष नेत्यांची गर्दी, मात्र केवळ तीन महिला नेत्या !

या संघर्षामागील मूळ कारणांवर नजर टाकल्यास, इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र क्षमतेच्या विस्तारामुळे इस्रायल आणि अमेरिकेची चिंता वाढली होती. वारंवार इशारे देऊनही इराणने आपली भूमिका बदलली नसल्यामुळे इस्रायल आणि अमेरिकेकडून तेहरानवर हल्ला करण्यात आला, ज्यामुळे मध्यपूर्वेत तणाव अधिकच वाढला आहे.

सध्याच्या परिस्थितीत कोणतीही ठोस कारवाई झाल्यास त्याचे जागतिक परिणाम गंभीर असू शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पुढील काही तास आणि दिवस हे आंतरराष्ट्रीय राजकारणासाठी अत्यंत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!