व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Uddhav Thackeray Shivsena: दोन्ही शिवसेनेत ‘इनकमिंग’ची स्पर्धा, आता शेकडो कार्यकर्त्यांसह ६ विद्यमान,...

Uddhav Thackeray Shivsena: दोन्ही शिवसेनेत ‘इनकमिंग’ची स्पर्धा, आता शेकडो कार्यकर्त्यांसह ६ विद्यमान, ८ माजी सरपंच उद्धवसेनेत

Former and current village sarpanches join Uddhav Thackeray’s Shivsena : भाजप, काँग्रेस, वंचित आणि शिंदेंच्या सेनेतून ठाकरेंच्या शिवसेनेत, मुंबईत पक्ष प्रवेश

Mehkar जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लांबणीवर पडल्या असल्या तरी जिल्ह्यात राजकीय पक्षांमध्ये इनकमिंगची स्पर्धाच सुरू आहे. शिवसेनेच्या शिंदे गट आणि उध्दव ठाकरे गट यांच्यामध्ये ही स्पर्धा सर्वाधिक असल्याचे चित्र आहे. चिखलीत शिंदे सेनेच्या पक्ष प्रवेश कार्यक्रमानंतर आता उद्धव सेनेतही पक्ष प्रवेश होत आहेत.

मेहकर आणि लोणार तालुक्यातील शिंदे गट, भाजप, काँग्रेस तसेच वंचित बहुजन आघाडीतील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी मुंबईतील ‘मातोश्री’ येथे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत उद्धवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशात ६ विद्यमान आणि ८ माजी सरपंचांचा समावेश असल्याने स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

मुंबईतील ‘मातोश्री’वर पार पडलेल्या या पक्षप्रवेश सोहळ्याला खासदार अरविंद सावंत, संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, विनायक जालिंदर बुधवंत, प्रा. आशिष रहाटे, राजू बुधवंत, जीवन घायाळ, डॉ. सार्थ खरात यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी नव्या सदस्यांचे स्वागत करत त्यांच्या प्रवेशामागील कारणे जाणून घेत आगामी राजकीय वाटचालीबाबत मार्गदर्शन केले.

Ashok kharat case : नाशिक भोंदूबाबा प्रकरणात अशोक खरातला न्यायालयीन कोठडी

पक्षात प्रवेश करणाऱ्यांमध्ये प्रा. गजानन खरात, सोपान सोनुने, विलास मोरे, साहेबराव वाठोरे, केशवराव वानखेडे, तेजराव अवसरमोल, अर्जुनराव ढगे, विठ्ठल टाकरस, प्रतापराव सांगळे, उत्तमराव राठोड, गणेश मुंढे, शेख इस्लाम, गुलाब वाकळे, गजानन नरवाडे, गोपीचंद राठोड, संतोष थोरवे, विश्वनाथ सांगळे, गजानन मोरे, कुंडलिक राठोड, तुकाराम जायभाये, दशरथ जाधव, शिवाजी सोनुने, मनीष फलटणकर आदींसह अनेक विद्यमान व माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. हा पक्षप्रवेश आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. मेहकर आणि लोणार तालुक्यातील ग्रामीण भागात प्रभावी नेतृत्व उद्धवसेनेकडे वळल्यास विरोधी गटांसाठी हे आव्हानात्मक ठरू शकते.

Iran war update : ट्रम्प म्हणतात, पाकिस्तानने केली होती युद्ध थांबवण्याची विनंती !

विशेष म्हणजे शिंदे गट, भाजप, काँग्रेस आणि वंचितमधील कार्यकर्ते एकाच वेळी उद्धवसेनेत दाखल झाल्याने ग्रामीण मतदारसंघात नव्या राजकीय ध्रुवीकरणाची प्रक्रिया सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत.

error: Content is protected !!