व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Sudhir mungantiwar : आईने मागणी केली, मुनगंटीवारांनी 24 तासात व्हीलचेअर दिली; संवेदनशील...

Sudhir mungantiwar : आईने मागणी केली, मुनगंटीवारांनी 24 तासात व्हीलचेअर दिली; संवेदनशील नेतृत्वाची प्रचिती

Sudhir mungantiwar availed a wheelchair for handicapped boy within a day : मुनगंटीवारांनी दिव्यांग मुलासाठी दुसऱ्याच दिवशी घरी पाठवली व्हीलचेअर; कुटुंबाच्या डोळ्यात आनंदाश्रू

Chandrapur आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या संवेदनशील व तत्पर नेतृत्वाची पुन्हा एकदा प्रचिती आली असून, एका दिव्यांग मुलासाठी केवळ एका दिवसात व्हीलचेअर उपलब्ध करून देत त्यांनी मानवी मूल्यांची जपणूक अधोरेखित केली. महाकाली कॉलरी येथील कु. लक्ष श्रीधर सदाला या दिव्यांग मुलासाठी त्यांच्या आईने ५ एप्रिल २०२६ रोजी एका कार्यक्रमात आ.मुनगंटीवार यांच्याकडे व्हीलचेअरची विनंती केली होती. ही मागणी ऐकताच आ. मुनगंटीवार यांनी तात्काळ मदतीचे आश्वासन दिले आणि त्या आश्वासनाची दुसऱ्याच दिवशी पूर्तता करत ६ एप्रिल रोजी दुपारी व्हीलचेअर थेट त्यांच्या घरी पोहोचविण्यात आली.

कु. लक्ष श्रीधर सदाला हे महाकाली कॉलरी, चंद्रपूर येथील रहिवासी असून, त्यांच्या दैनंदिन हालचालींसाठी व्हीलचेअरची अत्यंत गरज होती. त्यांच्या आईने व्यक्त केलेली ही मागणी मनापासून ऐकत आ. मुनगंटीवार यांनी त्वरित निर्णय घेतला. त्यांच्या सूचनेनुसार स्थानिक कार्यकर्त्यांनी अल्पावधीतच आवश्यक व्यवस्था करून व्हीलचेअर त्यांच्या घरी पोहोचवली.

Sudhir mungantiwar : मुनगंटीवारांचा बैठकांचा धडाका! जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नांवर प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर

व्हीलचेअर मिळाल्यानंतर कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्ट दिसून आला. एका दिवसात मदत मिळाल्यामुळे कुटुंबाने आ. मुनगंटीवार यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. नेतृत्व म्हणजे केवळ निर्णय घेणे नव्हे, तर सामान्यांच्या वेदना समजून त्यावर तत्काळ कृती करणे, याची प्रचीती या घटनेतून आली. यावेळी व्हीलचेअर सुपूर्द करताना श्री. ब्रिजभूषणजी पाझारे, सौ. वाणीताई सदालावार, शैलेश सदालावार, संजय भीमनवार व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. ही घटना आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या संवेदनशीलतेची आणि समाजाप्रती असलेल्या बांधिलकीची जिवंत उदाहरण ठरली आहे.

error: Content is protected !!